हदगाव,शेख चादपाशा| हदगाव तालुक्यात पावसळा संपला तरी तालुक्यातील वाळू घाट सुरु न झाल्याने दिवसेंदिवस वाळु माफिया चा सक्रिय सहभाग वाढत असुन या मुळे या मुळे वाळु घाट सुरु न केल्या मुळे काही बांधकामे ठप्प पडलेली असुन याचा फटका सहीत्य विक्रेते ठेकेदार आणि मजुरदारांना बसत आहे दुसरीकडे वाळु डेपो सुरु न केल्या मुळे तहसिलस्तारावर प्रशासन फार अडचणीत येत असुन वाळु तस्करी करणारे हे बहुसंख्य प्रशासनावर राजकीय दबाव आणत असल्याने प्रशासन ही हतबल होतांना दिसुन येत आहे.
तालुक्यात वाळु घाट चेडकापुर.साप्ती .बोरगाव.धानोरा .रुई.बनचिंचोली. गोर्लेगाव. बेलमंडळ .गुरफळी मनुला.हे प्रशासनाने वाळु घाट निश्चित केले असले तरी या व्यतिरिक्त चोरट्या मार्गाने ट्रक्टरद्वरे टिप्पर द्वरे वाळु ची तस्करी होतांना दिसुन येत आहे हदगाव तालुक्यात तीन पोलिस स्टेशन आहेत त्यांची गुन्हे शाखाची गस्त काय करित आहे हा पण एक संशोधानचा विषय आहे. गस्त असतांना एक ही अवैध रेतीचे वाहन वाहन मिळु नये मागील काही महीण्यात महसुल विभागाने अवैध रेतीचे वाहने पकडली असली तरी प्रशासनावर अप्रत्यक्षपणे राजकीय दबाव येत होता. तरी प्रशासनाने दबावला बळी न पडता कारवाई केली आहे. सध्या परिस्थितीत रेती माफीया कडुन दुप्पट तिप्पट दराने वाळुची विक्री होतांना दिसुन येत आहे. माञ सरकारचे दुर्लक्ष आहे असा आरोप नागरिक करित आहे. नागरिकांना स्वस्त दरात वाळु उपलब्ध व्हावी या करिता ‘महाखनिज ‘ संकेतस्थाळावर आँनलाईन अर्ज मागविले जात होते. परंतु याला वाळु माफीयांच्या दबावमुळे कोणी अर्ज दाखल केले नसल्याची चर्चा आहे.
वाळु डेपो सुरु करा…
शासनाने सुरु केलेले नवीन वाळू धोरण सर्वसामान्य नागरिकांच्या फायद्याचे आहे. या करिता हदगाव तालुक्यात वाळु डेपो त्वरीत सुरु करावे अशी सर्व सामन्य जनतेची मागणी आहे. हदगाव तालुक्यातील बेलमंडल येये तालुक्यातील वालू डेपोच प्रस्ताव तहसिल कार्यालयाच्या महसुल विभागाने पाठविलेला परन्तु त्यास मंजुरी जिल्हा प्रशासना कडुन मिळाली नसल्याचे प्रशासनाकडून सागण्यात आले आहे.