सराफा लाईन इतवारा नांदेड परीसरातील खुनाच्या गुन्हयातील आणखी तीन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
3 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

नांदेड। सराफा लाईन इतवारा, नांदेड परीसरात दिनांक 06/11/2023 रोजी रात्री 8.00 वाजताचे सुमारास सागर यादव रा. जुनागंज इतवारा, नांदेड याचा काही इसमांनी खुन केला होता त्यावरुन पोलीस ठाणे इतवारा गुरनं. 245/2023 कलम 302, 307, 384, 386, 294, 143, 146, 147, 148, 149, 120 (ब) भा. द. वि. सहकलम 4/25 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल असुन नमुद गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवुन अटक करण्याबाबत मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक स्थागुशा, नांदेड यांनी पथके तयार करुन आरोपीतांना अटक करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.

दिनांक 30/12/2023 रोजी स्थागूशा चे पथकातील पोउपनि दत्तात्रय काळे यांना मिळालेल्या माहीतीनुसार नमुद गुन्हयातील आरोपी हे पुणे येथे असल्याने पोलीस निरीक्षक, स्थागुशा यांनी सदर पथकास वरीष्ठांची परवानगी घेवुन पुणे येथे रवाना केले. स्थागुशा चे पथकाने चिंबळी ता खेड जि पुणे येथे जावुन स्थानिक पोलीसांची मदत घेवुन सापळा रचुन आरोपी नामे 1) आकाश पिता गोविंदराव लुळे वय 21 वर्ष व्यवसाय बेकार रा. तानाजी नगर, नांदेड 2) दिपक पिता अर्जुन पवार वय 21 वर्ष व्यवसाय बेकार रा. शिवनगर, नांदेड 3) पप्पु पिता शेषेराव गजलवाड वय 20 वर्ष व्यवसाय बेकार रा गोपाळनगर, नांदेड यांना ताब्यात घेवुन गुन्हयासंबंधाने विचारपुस केली असता, त्यांनी गुन्हा केल्याचे सांगीतल्याने त्यांना पोलीस ठाणे इतवारा गुरनं. 245/2023 कलम 302, 307, 384, 386, 294, 143, 146, 147, 148, 149, 120 (ब) भा. द. वि. सहकलम 4/25 शस्त्र अधिनियम गुन्हयाचे पुढील तपासकामी देण्यात आले आहे. नमुद आरोपी हे पोलीस ठाणे विमानतळ गुरनं. 420/2023 कलम 3/25, 7/25 शस्त्र अधिनियम या गुन्हयात पाहीजे आरोपी असुन नमुद आरोपीताकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय, पो. नि. स्थागूशा नांदेड, पोउपनि / दत्तात्रय काळे, आशिष बोराटे, पोहेकॉ/बालाजी तेलंग, पोकॉ/विलास कदम, विठ्ठल शेळके, गणेश धुमाळ, गजानन बयनवाड, रणधीर राजबन्सी, तानाजी येळगे स्थागुशा, नांदेड व सायबर सेलचे पोहेकॉ/ दिपक ओढणे, राजु सिटीकर व पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड येथील पोउपनि गणेश रायकर व अमंलदार मोहम्मद नदाब यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!