नियोजनाचा अभावचा परिणाम…हदगाव शहरात खड्डेच खड्डे गेला रोड व नाल्या कुणीकडे…?
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहरात व तालुक्यात शासना च्या विविध योजनेद्वारे करोडो रुपयाचा निधी विविध पक्षाचे नेते. विद्यमान आमदार व खासदार आणत आहेत त्या भागात उद्घाटनही होत आहेत. पण पण हदगाव शहरातील काही प्रभाग नागरी सुविधा पासून व विकासापासून कोसो दूर आहे. याबाबत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नियोजन करण्यात तर येत नाही ना अशी उलट सुलट चर्चा हदगाव शहरासह तालुक्यात ऐकवायास मिळत आहे.
कारण या बाबतीत स्थानिक माध्यमांना संबंधित प्रशासना कडून कोणती ही माहिती मिळत नाही. शहरातील जुन्या भागात गेल्या 20 ते 25 वर्षापासून रोड, नाल्या नाहीत करोडो रुपयांचा निधी नेमका कुठे टाकण्यात येत आहे. त्या कामाचा बोर्ड लावणे आवश्यक असताना तसा बोर्डही पण काही कामावर दिसून येत नाही. आणलेला निधी नेमका राज्य शासनाचा की केंद्र शासनाचा..? असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडलेला आहे.
हदगाव विधानसभा क्षेत्राचे आ. माधवराव पा. जवळगावकर हे हदगाव शहरात एकदा तरी फेरफटका मारून आढावा घेऊन शहरातील काही विशिष्ट भागात नागरी समस्या अध्याप सोडवण्यात आलेल्या नाहीत. त्या का सोडवण्यात आल्या नाहीत याबाबत भेदभाव झाला का..? याची चौकशी करावी अशी मागणी नागरिकांतुन होत आहे. गेल्या गेल्या दहा वर्षा पासून हदगाव नगर परिषदवर काँग्रेसच्या माध्यमातून विद्यमान आमदारांची एक हाती सत्ता होती. त्यांच्याच विश्वासातील काही बड्या नगरसेवकांनी न.पा. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागात अनेक विकासाची कामे केल्यामुळे बाकीच्या प्रभागात कोणतेही काम झालेले नाही.
जिथे झालेले आहे तिथे त्या कामाचा दर्जा पाहिला असता केवळ सुमार दर्जाचे कामे करून बील उचलण्यात आलेली आहे. शहरात जुन्या भागात गेल्या दोन दशका पासून रोड नालीचा प्रश्न जैसे थे आहे. या बाबतीत अनेक वेळा संबंधित नगरसेवक व नगराध्यक्ष विद्यमान आमदारांना विविध माध्यमातून निदर्शनास आणून देण्यात आले होते. पण त्याची दखल घेण्यात आलेली नाही आता लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या नेते विद्यमान आमदार व खासदार मार्फत हदगाव विधानसभा क्षेत्रात लाखो नव्हे तर करोड रुपयाचा निधी उपलब्ध होत आहे.
मात्र शहरातील काही भागात नरक पुरीचे जीवन जगणाऱ्या हदगावच्या काही विशिष्ट भागाकडे का..? दुर्लक्ष झाले आहे. असा संतप्त सवाल ही नागरिक करित असताना दिसून येतात. विशेष म्हणजे या भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी अद्यापही पुरेसे मिळत नाही. अद्यापही रोडचे काम करण्यात आलेच नाही. रोडच्या बाजूला नाल्या पण करण्यात आल्या नाही. यामुळे रस्त्यात खड्डे पडलेले आहेत रोड नाल्यांच काम न झाल्यामुळे सांडपाणी रोडवर येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. हदगाव शहरा तील जुन्या भागातील मुख्य रोडवर साधे पायदळी चालने पण कठीण झालेले आहे हे आवर्जून उल्लेख करावा लागेल.