नांदेड| पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण जि. नांदेड हडित रेकॉर्डवरील आरोपी चेकोगकामी व फरारी, पाहिजे आरोपीचा शोध घेवुन त्याना अटक करण्यासाठी श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक साहेब, नांदेड, अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग इतवारा, नांदेड यांनी सुचना दिल्या.
पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथील प्रभारी अधिकारी श्रीधर जगताप सहा. पोलीस निरीक्षक, यांनी गुन्हे शोध पथकातील आनंद विचेवार, पोलीस उप निरीक्षक, पोहेकॉ/1991 वाकडे, पोहेकॉ/492 जाधव, पोहेकॉ/741 मलदोडे, पोना/1812 शेख सत्तार, पोना/2590 मुंडे, पोकॉ/3376 स्वामी, पोकॉ/170 बेल्लुरोड, पोकॉ/2907 कलंदर, पोकों/221 माने, पोकॉ/914 तेजवंद, पोकॉ/1019 दासरे, यांना योग्य त्या सुचना देवुन आदेशित केले असता गुन्हे शोध पथकातील प्रमुख व अंमलदार यांनी आपले कौशल्य वापरुन गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे नांदेड ग्रामीण पोलीसानी सापळा रचुन विधीसंघर्षात बालकास कौठा, नांदेड येथुन ताब्यात घेवुन पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यातुन खालील वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला आहे.
वरील प्रमाणे मुद्देमाल मिळून आल्याने नमुद विधीसंघर्षात बालकास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, देगांवचाळ येथे एका घरातुन घरफोडी केली आहे. असे त्याने सांगीतले त्यावरुन नांदेड ग्रामीण पोलीसांनी पो.स्टे. वजिराबाद येथे याबाबत विचारपुस केली असता देगांवचाळ येथील अनिल ग्यानोबा भोळे यांचे घरी घरफोडी झाली असुन त्यामध्ये वरील वर्णनाचा मुद्देमाल गेला असुन पो.स्टे. वजिराबाद गु.र.नं. 517/2023 कलम 457,380 भा.दं.वी. प्रमाणे अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल आहे. असे सांगीतले. त्यावरुन पो.ना./1812 शेख सत्तार यांनी दोन पंचासमक्ष वरील मुद्देमाल सविस्तर जप्ती पंचनामा करुन ताब्यात घेतला. सदर विधीसंघर्षात बालकास पुढिल तपासकामी पो.स्टे. वजिराबाद नांदेड याचे ताब्यात देण्यात आले आहे.