पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज होणार हिमायतनगरसह चार रेल्वेस्थानकांची पायाभरणी

नांदेड/हिमायतनगर,अनिल मादसवार| देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत नांदेड रेल्वे विभागात येणाऱ्या हिमायतनगर, भोकर, मानवत रोड आणि रोटेगाव रेल्वे स्थानकांसह ४८ उड्डाण पूल, भुयारी पूलाच्या काम सुरू होणार आहे. या सर्व कामांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईनच्या माध्यमातून आज दिनांक 26 फेब्रुवारी, 2024 रोजी सकाळी 10:30 वाजता होणार आहे. या कार्यक्रमास त्या त्या भागातील नागरिकांनी होऊन शोभा वाढवावी असे आवाहन विभागीय रेल्वे व्यवस्थापक निती सरकार यांनी न्यूज फ्लॅश 360 च्या माध्यमातुन केलं आहे.
विभागीय रेल्वे कार्यालयात काल रविवारी यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हि माहिती दिली आहे. यावेळी रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. पुढे बोलतांना निती सरकार म्हणाल्या की, भारतीय रेल्वेमध्ये सुरू असलेल्या परिवर्तनीय वाढीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी ५५४ अमृत स्थानकाचे आणि १५०० रस्ते, ५०० उड्डाण पूल, भुयारी पूलांचे भूमिपूजन, उद्घाटन तथा लोकार्पण करणार आहेत. त्यायाच नांदेड रेल्वे विभागातील ४ अमृत स्थानक आणि ४८ उड्डाण पूल, भुयारी पूलाच्या कामाची पायाभरणी केली जाणार आहे.
रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणावर रेल्वे स्थानके अपग्रेड करण्यासाठी एक मोठे परिवर्तन कार्य अमृत योजनेतून सुरू आहे. अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत, देशभरातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे. केवळ आधुनिक प्रवासी सुविधा पुरवण्यासाठीच नव्हे तर शहराच्या लोकसंख्येला विकसित केंद्रांमध्ये रूपांतरित करण्यासाठी या मिशनला बळ मिळाले आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली. हेच कार्य पुढे नेत यामध्ये आणखी ५५४ स्टेशनसाठी पायाभरणी, उदघाटन तथा लोकार्पण केले जात आहे. यामध्ये तेलंगणा १५, आंध्र प्रदेश ३४, महाराष्ट्र ६ आणि कर्नाटक २ या 4 राज्यांमध्ये पसरलेल्या दक्षिण मध्य रेल्वेच्या ५७ स्थानकांचा समावेश आहे.ज्याची एकत्रित किंमत सुमारे ९२५ कोटी एवढी आहे.
रेल्वे मंत्रालयाने तयार केलेल्या अमृत भारत स्टेशन स्कीम धोरणातंर्गत रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करणे, दीर्घकालीन दृष्टीकोनातून सतत विकासाची कल्पना करणे आहे. दर्शनी भाग आणि सौंदर्यदृष्ट्या सुखकारक प्रवेशद्वार व किफायतशीर पार्चेसची निर्मिती करणे. रस्त्यांचे रुंदीकरण, अवांछित संरचना काढून टाकणे, योग्यरित्या डिझाइन केलेले चिन्ह, समर्पित पादचारी मार्ग, सुनियोजित जित पार्किंग क्षेत्र, सुधारित प्रकाश इत्यादीद्वारे सहज प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी स्थानकावरील दृष्टीकोन सुधारणे. लँडस्केपिंग, हिरव्या पॅचची निर्मिती करणे, यासह अनेक विकास कामे होणार आहेत, असे निती सरकारने सांगीतले.
तर होणारी उड्डाण पूल व भुयारी पूलांमूळे रस्ते आणि रेल्वे वापरकर्त्यांच्या सुरक्षितता वाढविण्यास मदत होईल. लेव्हल क्रॉसिंग गेट्सवर कोणत्याही अडथळ्याशिवाय रस्ता वापरता येईल. ज्यामुळे जनसमान्यांचा प्रवासाचा वेळ आणि इंधन खर्च वाचेल. तसेच रेल्वे गेट संपुष्टात आल्यामुळे रेल्वे गाडी पूर्ण वेगाने धावू शकतील, ज्यामुळे वेग वाढण्यात मदत होईल. रेल्वे गेटवर अपघाताची संभावना संपुष्टात येईल. परिसर, गावे आणि शहरे यांना अखंड जोडणारा पूल म्हणून कार्य करेल. या सर्व उपक्रमांमुळे नदिड विभागातील रेल्वेच्या पायाभूत सुविधा तसेच सुरक्षा अधिक बळकट होतील, तसेच त्याच्या रेल्वे नेटवर्कवरील सुरक्षा मानकांमध्येही वाढ होईल.
या रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे जेणेकरून काम नियोजित कालावधीत पूर्ण होईल. पूर्ण झाल्यानंतर, हि रेल्वेस्थानके आधुनिक सुविधांसह या स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना अनोखा अनुभव देईल. तसेच नांदेड विभागाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे, असे सांगत पुर्णा येथील डिझेल घोटाळ्याची व्यापकता वाढली तर यात सीबीआय चौकशी करण्याची शासनाकडे मागणी करू, असे सरकार यांनी सांगीतले.
