नांदेड। राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. रोहित पवार यांना ईडीने नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलाविले. ईडीकडून करण्यात आलेल्या या कारवाईचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निषेध करण्यात येत आहे. नांदेड येथील आयटीआय चौकात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमिनदार व ग्रामीण जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात निदर्शेने निषेध करण्यात आला. यावेळी ‘सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करत है’ अशा विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
राज्यात सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्षातील नेत्यांच्या विरोधात सीबीआय, ईडी यांच्यामार्फत कारवाई करून पक्षातील नेत्यांना गोत्यात आणण्याचे काम सुरू असल्याचे आरोप विरोधी पक्षाकडून होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार यांनाही ईडीने नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलाविले. या कारवाईचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून राज्यभर निषेध होत आहे. नांदेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून आयटीआय चौकात कारवाईचा निषेध सरकारच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमिनदार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी, प्रदेश सचिव निखील नाईक, उत्तर विधानसभा अध्यक्ष पंकज कांबळे, मोहम्मद सरफराज अहेमद, विक्रम ठाकूर, आतिक बिल्डर, सरदार पटेल, कदीर कुरेशी, इस्लम चाऊस, शेख इमरान, अनिल सरोदे, शेख सोहेल, जैद कादरी, शहेरयार खान, शेख अकबर, सिद्धार्थ जोंधळे, विजय पाटील, सत्यपाल सोनटक्के, हरिश सोनटक्के, बाळू गुणाळेकर, शेख सरदार मिरा, अकबर इनामदार, अनिकेत भंडारी, शेख निसार, मोहम्मद कमरान खान, अब्दुल सत्तार, सुफी तौफिक खादरी, सुनील कसबे, भीमराव सुर्यवंशी, कोमेश बालशंकर, कपिल ससाणे, रूख्माजी घोडगे, विजय रणखांब, संभाजीराव गोमसकर, अनिल मलहारे, गणेश वडजे, ओंमकार वाघमारे, विशाल गिरी, ओंमकार गिरी, रवी भोरगे, विजय जोंधळे, निलेश सोनाळे, अक्षय रत्नपारखे, माधव बुक्तरे, अमोल पवार, संघर्ष कांबळे, ओंमकार कांबळे, रवी वाघमारे, सुनील वाघमारे, प्रमोद कांबळे, राहुल बुक्तरे, देवानंद धोंडगे, राजू धोंडगे, सुदर्शन वाघमारे, गोपीनाथ वाघमारे, अनिकेत कपाळे, किशन वाघमारे, शरद लामतिळे, विष्णु वाघमारे, अनिकेत सुर्यवंशी, आकाश पवार, कमलेश बारशंकर, शैलेश गजभारे, प्रशांत सावते, नरेंद्र बुक्तरे, अजय ढवळे आदींची उपस्थिती होती.