नांदेड| ज्ञानतीर्थ 2023 आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाच्या डॉ. श्रीराम लागु नाट्यमंचावर स्पर्धक कलावंतांनी सिनेकलावंत, राजकीय नेते, विविध पक्षी आदींचे हुबेहुब आवाज काढत त्यांच्या नक्कल करत प्रेक्षकांना पोट धरुन हासायला लावले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरचा विद्यार्थी प्रतिक इंगोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रामदास आठवले यांच्या आवाजाची हुबेहुब नक्कल सादर केली. मंचावर राजकीय नेते आवरले की काय? असा भास होत होता, गजानन मिश्रा या दयानंद वाणिज्य महाविद्यालाच्या कलावंताने प्राण्यांचा आवज काढत मंचावर प्राणी आवतरले असी परिस्थिती निर्माण झाली. यामुळे प्रेक्षकही आंचबित झाले. गदर चित्रपटातील संवाद सीमा हैदर या जोडीला साजेल अशी नक्कल ऐकायला मिळाली.
या संवादामध्ये धरमेंद्र, सनीदेवल, आजय देवगण, निळू फूले, नाना पाटेकर, मकरंद आनासपुरे, दादा कोंडके यांच्या आवाजाची संगती प्रेक्षकांना हासवायला लावत होती. आर्जून पवार यांने सादर केलेली शरद पवार यांची राजकारणातील भाषाशैलीची नक्कल चांगलीच गाजली. तर प्रिती ऐलाने हिने गाढवाच लग्न या नाटकातील प्रसंग हुबेहुबपणे प्रेक्षकांसमोर मांडला. सातो कॉलेज कळमनूरीची कलावंत सायील सय्यद हीने दारुड्याची नक्कल प्रेक्षकांना भाराऊन टाकणारी होती. नक्कल या कालप्रकारात एकुण 12 संघ सहभागी होते.