श्रीक्षेञ माहुर, कार्तिक बेहरे| माहुर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अति जगरुक असलेल्या बंजारा तांडा या गावच्या आदिवासी महिला सरपंच दुर्गाबाई जयंतराव उरवसे, त्यांचे पती ग्राप सदस्य जयवंतराव भीमा उरवसे तसेच त्यांचा मुलगा ग्राप सदस्य गोपाळ जयवंतराव उरवसे यांना जिल्हाधिकारी नांदेड यांचे आदेश क्रमांक २०२३/जीबी/ डेस्क_१/ग्रापंनि/टे१६/सिआर -९२ दि.१० जून २०२४ रोजी प्रतिवादी विशाल जोगराम राठोड, यांच्या अर्जानंतर वरील तीघांना ही निलंबनाचे आदेश बजावले होते.
त्या विरुद्ध आदिवासी महिला सरपंच व ईतर दोन ग्रापं सदस्यांनी दि.३१ जून २०२४ रोजी ॲड.दिलीप राठोड यांचेमार्फत अपिल दाखल केले होते.त्याविरुध्द प्रतिवादी विशाल राठोड यांचे वकील ॲड.सुभाष जाधव यांनी कॅव्हेट दाखल केले असल्याने दि.२४ जुलै २०२४ रोजी दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून दि.३० जुलै २०२४ रोजी छत्रपती संभाजी नगरचे अप्पर आयुक्त बाबासाहेब जालिंदर बेलदार यांनी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या त्या आदेशास पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिल्याने येत्या १५ ऑगष्टचा स्वातंत्र्य दिनाचा झेंडा फडकवण्याचा मान या आदिवासी महिलेकडे अबाधित राहिला आहे.
या स्थगन आदेशामुळे धाडसी महीला आदिवासी सरपंच दुर्गाबाई उरवसे यांचे शिवसेना जिल्हाप्रमुख उबाठा गटाचे जोतिबादादा खराटे, कॉंम्रेड शंकर सिडाम, डॉ.नामदेव कातले, बंजारा समाजाचे धडाडीचे युवा नेते सुशील जाधव, बंजारा तांड्याचे उपसरपंच आशाताई जाधव, कृबाचे संचालक गणपत मडावी इत्यादींनी प्रत्यक्ष भेटून या आदिवासी समाजातील रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरपंच दुर्गाबाईचे अभिनंदन केले.