श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहरे| आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) दि. ४ ते ११ ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील सर्वच विधानसभा मतदारसंघ निहाय उमेदवार चाचपणी करण्यासाठी विधानसभाक्षेत्रात भगवा सप्ताह अभियानास सुरूवात केली आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष असलेल्या उबाठा शिवसेनेने मतदारसंघ निहाय उमेदवारांची चाचपणी करीत असल्याने विधानसभा संपर्क प्रमुख वेदप्रकाश पाठक हे किनवट माहुर विधानसभा क्षेत्रात दि.४ ते ११ ऑगस्ट दरम्यान कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या गाठी भेटी घेत येथिल अहवाल पक्षश्रेष्ठी यांच्याकडे सोपविणार असल्याने येथील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या भगवा सप्ताह संपर्क अभियाना दरम्यान उमेदवार चाचपणी करतांना वेदप्रकाश पाठक,किनवट-माहूर विधानसभा क्षेञ प्रमुख ज्योतिबा खराटे, तालुका प्रमुख मारुती दिवसे पाटील ,प्रशांत कोरडे, बजरंग वाडगुरे, निरधारी जाधव अभिषेक जयस्वाल यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.