आनंद दत्तधाम आश्रमात दत्ता महाराज यांचा पुण्यस्मरण सोहळा संपन्न !

श्रीक्षेञ माहुर, कार्तिक बेहरे। आनंदगिर सद्गुरू दत्ता महाराज वसमतकर यांची अठरावी पुण्यतिथी दि. ४ जुलै २०२४ रोजी गुरुवारी सकाळी ११ वाजता आनंद दत्तधाम आश्रमात उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी हजारो भक्त पत्रकारासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी जातीने उपस्थित होते. कार्यक्रमाचे वैशिष्ठ्य म्हणजे मठाधिपती साईनाथ महाराजांनी सुमारे दोन तास समाज प्रबोधन व अध्यात्म यांची सागड घालणारे सूश्राव्य किर्तनाने वेगळ्याच विश्वात घेऊन गेले हे या ठिकाणी उल्लेखनीय आहे.
याप्रसंगी बोलताना साईनाथ महाराज म्हणाले की, कलियुगात केवळ दत्तभक्तीच मानवाला तारणारी असुन “तु मला शरण ये मी तुला मुक्त करतो” याची प्रचिती येणारे दैवत म्हणजे दत्तप्रभुच आहेत, दिगंबरा दिगंबराच्या सतत गजराने, चिंतनाने व किर्तनाने ईहलोकातील संकटे तर दुर होतातच परंतु जिवन यात्रा संपल्यानंतर तो स्त्री,पुरुष ईतर कोणत्याही लोकी न जाता दत्तलोकीच जाणार असे प्रतिपादन त्यांनी भक्त संप्रदायाच्या विविध धार्मिक ग्रंथाच्या आधारे केले आहे.सदरील कार्यक्रमात नांदेड,परभणी, यवतमाळ, हिंगोली लातूर, या पाच जिल्ह्यातील पत्रकारांचा स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आल्याने या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.एस.पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सुधीर जाधव यांनी केले.कार्यक्रमानंतर हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असुन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व भक्तांनी विशेष परिश्रम घेतले आहे.
