![](https://newsflash360.in/wp-content/uploads/2023/11/tukadoji.jpg)
हिमायतनगर| तन-मन, धन से सदा सुखी हो भारत देश हमारा या उद्देशाला सध्या करण्यासाठी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यतिथी निमीत्त बाल सुसंस्कार शिबीर सप्ताहांचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिरात भजन, किर्तन सामुदायिक ध्यान, प्राणायाम, योग्य, बौद्धिक सत्र यासह विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत. शहर व तालुक्यातील पालकांनी आपल्या पाल्याना या शिबीरात सुसंस्काराचे धडे गीरविण्यासाठी पाठवावे असे आवाहन गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
सदर सुसंस्कार शिबीर सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन हिमायतनगर शहरातील पळसपूर रस्त्यावर असलेल्या जतनबाई शेखावत आश्रम शाळा येथे करण्यात आले असून, रोज गुरुवार दि.१६ नोव्हेंबर ते रोज बुधवार २२ नोव्हेंबर पर्यंत हे शिबीर चालणार आहे.
लहान पणी आश्रमी न्यायी मुले।
जैसे विश्वमित्र्य राम-लक्ष्मण गेले।
सांधीपणी द्रौणानी शिकविले ।
तैसे विविध ज्ञान द्यावे ।।… ग्रामगीता
त्यांना सहवास उत्तम द्यावा ।
दर्जा जीवनाचा वाढवावा।
त्याने समाज होईल नवा ।
ज्ञानवंताचा निर्माण ।।… ग्रामगीता
आजचे सान सान बाल।
उद्याचे कार्यकर्ते होतील।
गावाचा पांग फेडतील उत्तम उत्तम गुनाने।।… ग्रामगीता
ग्रामगीतेत तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या या ओवीप्रमाणे बालकामध्ये सुसंस्कार रुजविण्यासाठी यंदाही शिबिराचे आयोजन ब्रम्हलिन वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यस्मृती दिना प्रित्यर्थ बाल सुसंस्कार शिवीर सप्ताह आयोजन करण्यात आला आहे. तरी हिमायतनगर तालुक्यातील व शहरातील इच्छुक पालक वर्गानी आपल्या पाल्याला या कार्यक्रमात सुसंस्काराचे धडे गिरविण्यासाठी पाठवावे. सप्ताहात कार्यक्रमाची रुपरेषा पुढील प्रमाणे राहणार आहे.
प्रातः स्मरण: सकाळी ४.३० वा., प्रातः विधी ४.३० ते ५.३०, सामुदायीक ध्यान: ५.३० ते ६.३०, योगासन व प्राणायम ६.३० ते ७.३०, नाष्ठा किंवा फराळ : ७.३० ते ८.००, बौध्दीक सत्र ८.०० ते १०.००, भजन संगीत : १० ते ११, दुपारचे जेवन व विश्रांती : ११ ते २, मार्गदर्शन शिबीर दु. २.०० ते ४ (कृषी विषयक, सैनिक भरती, पोलीस भरती, व्यापार, गो- पालन विषयी अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन), ग्रामगीता काळाची गरज : ४ ते ५, लाठी काठी : सायं. ५ ते ६. सामुदायीक प्रार्थना : ६ ते ७, रात्रीचे जेवन: ७ ते ८ ओळख सुंदर जीवनाची ८ ते ९, किर्तन व राष्ट्रवंदना : ९ ते १०.३०. अश्या प्रकारे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीराम संभाजी वाळके (वाळकेवाडी) यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाणे होणार असून, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाऊसाहेब बऱ्हाटे (जिल्हा कृषी अधिक्षक, नांदेड) हे उपस्थित राहणार आहेत. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून – वैराग्यमुर्ती चैतन्य महाराज (कोंडदेव आश्रम, कांडली) ह.भ.प. ग्रामगिताचार्य सुनिल महाराज लांजुळकर, ह.भ.पं. ग्रामगीताचार्य वेदांत महाराज अकोटकर, संचलन ह.भ.प.गोपाळराव महाराज मुळझरेकर हे करणार आहेत. समारोपीय कार्यक्रम हिमायतनगर शहरातील वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मारक सामुदायीक प्रार्थना मंदिर, हिमायतनगर जि. नांदेड येथे संपन्न होणार असून, यावेळी हदगाव – हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांची उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमास गुरु देव सेवा मंडळ, हिमायतनगर, जवळगांव, टेंभी, आंदेगाव, सवना, मुरझळा, महादापूर, कारला. बोरगडी, बोरगडी तांडा, धानोरा, पळसपूर, सिरंजनी, पारवा, खडकी बा., पार्डी, भीश्याचीवाडी, पवना, पोटा, कोल्हारी, भीसी, कोसमेट, कुपटी, कांडली (ता. भोकर), सावरगांव, लगळूद, नांदा, जांबदरी टेकडी गुरुकुल, संच व सर्व ग्रामगीता प्रचारक व समस्त गावकरी मंडळी हिमायतनगर (वाढोणा) जि. नांदेड यांची उपस्थिती लाभणार आहेत. हा कार्यक्रम लोकसहभागातून आयोजित करण्यात आला असून, यासाठी शहरातील अन्नदाते व सहयोग दाते मंडळींचे सहकार्य लाभत आहे.
या सुसंस्कार शिबीरात सहभाग नोंदविण्यासाठी लागणारे कागदपत्रे पुढील प्रमाणे – (१) आधार कार्डची सत्यप्रत २) स्वतःचा १ फोटो, प्रवेश घेणान्या विद्यार्थ्यांनी सोबत अंथरुण-पांघरूण, बॅटरी, ताट, वाटी, ग्लास, १ वही, १ पेन, भगवी टोपी, ग्रामगीता, सक्रीय पाट सोबत आणावे. शिबिरात येणाऱ्या विद्यार्थ्यांनी साहित्यासाठी १०० रु. शुल्क भरावे लागणार आहे.
![](https://newsflash360.in/wp-content/uploads/2023/11/Hardweyar-Nagu.jpg)