नांदेड| मुख्य ग्रह सचिव महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य आणि पोलीस महानिरीक्षक नांदेड रिजन यांना मानवाधिकार आयोगांनी आठ लाख रुपये दंड आकारण्यात आलेला आहे.
दि 04 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता गावातील तडजोड टोळीने पुन्हा या मुलांना पोलीस स्टेशन ईस्लापुर येथे शेवाळे यांनी बोलावल्याचे सांगितले व सोबत घेऊन गेले. आमच्या विश्व हिंदु परिषद व बजरंग दलातील 4 कार्यकर्त्यांना तुम्हाला वारंवार सांगुन देखील कसायांच्या गाड्या का आडवता असं म्हणुन बेकायदेशीर मारहाण करून खच्चीकरण केले, जेनेकरून गोरक्षक कार्यकर्त्यांच्या मनात भीतीचे वातावरण पसरेल. आणि एकाधिकारशाही कशी चालेल अशा विचाराने शेवाळे यांनी या घटनेस चालना दिली होती. रझाकाराच्या सारखी दहशत निर्माण होईल अशाप्रकारचे अक्षम्य आणि बेकायदेशीर कृत्य सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रघुनाथ शेवाळे यांनी केलेली होती. पण त्यांनी आणि त्यांचे सहाय्यक टंकलेखक यांनी पुन्हा तेच केले आमच्या कार्यकर्त्यांवर दबाव टाकत, ॲट्रोसीटी ची भीती दाखवत जबाब घेऊन तपास संपवला होता.
त्याविरोधातही आम्ही दि 14 फेब्रुवारी 2023 रोजी पत्राद्वारे मा पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे यांच्या लक्षात आणुन दिले होते परंतु तरीही आम्हाला न्याय मिळाला नाही कारण तत्कालीन चौकशी समितीने शेवाळे आणि कसाई यांना वाचवण्यासाठी आतोनात प्रयत्न केले. आम्हाला आशा होती मानवाधिकार आयोगाच्या माध्यमातुनच आम्हाला न्याय मिळेल आणि त्याप्रमाणे मा श्री कमलकिशोर थातेड साहेब, चेअरमन आणि मा सईद साहेब, सदस्य, मानवाधिकार आयोग महाराष्ट्र राज्य यांनी पोलीस प्रशासनावर कडक शब्दात ताशेरे ओढत, आमच्या प्रत्येक गोरक्षक कार्यकर्त्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये प्रमाणे चौघांना एकुण आठ लाख रूपये दंड म्हणून देण्याचा निर्णय दिला आहे. आम्ही मानवाधिकार आयोगाचे ह्रदयपुर्वक आभारी आहोत.
आमच्या बाजुने ॲड किशोरजी जैन, ॲड पुनितजी शहा यांनी काम बघीतले, त्यांचे देखील धन्यवाद, तसेच या प्रकरणात विश्व हिंदु परिषद देवगीरी प्रांताचे प्रांत मंत्री आदरणीय श्री योगेश्वर गर्गेजी आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले त्यामुळे आज हे यश मिळाले आहे. या यशात मा श्री अशोक जैन,अध्यक्ष, महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा संनियंत्रण समिती महाराष्ट्र राज्य, आणि प्रसारमाध्यमांचा देखील सिंहांचा वाटा असून, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणुन आपण सर्वांनी मिळून या लढाईला यशापर्यंत पोहोचवले आहे. असे सांगत किरण सुभाष बिच्चेवार, नांदेड विभाग गोरक्षा प्रमुख, विश्व हिंदु परिषद देवगीरी प्रांत यांनी मीडियाचे आभार मानले आहेत.