क्राईमनांदेड

कोणतीही तपासणीं न करता नमुना नंबर ४३ व गावठाण प्रमाणपत्र देणाऱ्या हिमायतनगरच्या कार्यालयीन अधीक्षकासह सहकाऱ्यांना बडतर्फ करा

हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील नगरपंचायत अंतर्गत मयत शेतकऱ्याच्या नावे असलेल्या मालमत्ता क्र 401,402,403,404 व 405 ह्या वार्ड क्र 4 मध्ये बनावट नोंदी करून गैर मार्गाने व गैर उद्देशाने नमूना नं 43 व गावठाण प्रमाणपत्रे तयार करून देणाऱ्या अधिकाऱ्यास व त्याना सहकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यास तात्काळ सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंद करा अन्यथा विदर्भ – मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा यादीमध्ये उडी मारून कुटुंबासह आत्महत्या करणार असल्याचा इशारा मयत शेतकऱ्याच्या पत्नीने शासन – प्रशासनाला एका निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनामुळे पुन्हा हिमायतनगर शहर व परिसरात खळबळ उडाली असून, तालुक्यात सुरु असलेल्या तलाठी मंडळ अधिकारी यांच्यासह आता नगरपंचायत प्रशानातील अधिकारी कर्मचारी गैरप्रकार करण्यात किती तरबेज आहेत हे समोर येऊ लागले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पीडित विवाहित ज्योत्सना परमेश्वर जाधव वय ३५ वर्षे रा. परमेश्वर गल्ली, हिमायतनगर जि. नांदेड येथील रहिवासी असून, त्यांनी दि.२४ जानेवारी २०२४ रोजी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, हिमायतनगर येथिल नगर पंचायत अंतर्गत मयत परमेश्वर नारायणराव जाधव यांच्या नावाने मालमत्ता नोंद रजिस्टर (मूळ अभिलेखात) वॉर्ड क्र 4 मध्ये मालमत्ता क्र 401,402,403,404 व 405 ह्या बनावट नोंदी कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब न करता करण्यात आल्या होत्या. या बाबत त्यांनी मुख्याधिकारी नगर पंचायत हिमायतनगर यांना पत्र व्यवहार करून सदरील नोंदी कोणत्यावर्षी करण्यात आल्या व कोणत्या अधिकाऱ्याने ह्या नोंदी केल्या आहेत. याबाबत विचारणा केली असता मुख्याधिकारी नगर पंचायत हिमायतनगर यांनी जा.क्र.नपंहि साप्र/239/2023 दिनांक 23/06/2023 रोजी पत्राआधारे ह्या नोंदी सन 2022-2023 घेण्यात आल्या. मात्र ज्या आधारे नोंदी घेण्यात आल्या त्याबाबत कोणतीही कागदपत्रे आढळून आले नाहीत.

यावरून मुख्याधिकारी हिमायतनगर यांच्या पत्रामधून स्पष्ट होते की ह्या नोंदी बनावट आहेत व तसेच मुख्याधिकारी नगर पंचायत हिमायतनगर यांनी उप-विभागीय अधिकारी हदगाव यांच्या कडील सुनावणी दरम्यात स्पष्ट केले की, ह्या नोंदी नगरपंचायत हिमायतनगर येथील तत्कालीन अधिकारी रत्नाकर बाळासाहेब डावरे यांनी केल्या आहेत. नगर पंचायत हिमायतनगर येथील अधिकारी चंद्रशेखर शेषराव महाजन यांनी ह्या नोंदीच्या नमूना नं 43 गावठाण प्रमाणपत्रे कोणताही अभिलेख न तपासता जाणीवपूर्वक रीतसर कोणताही अर्ज न घेता कोणतीही शासकीय शुल्क न आकारता गैरमार्गाने व गैर उद्देशाने तयार करून दिल्या होत्या. या गावठाण प्रमाणपत्रा आधारे विक्रीखत तयार करण्यात आले आहे व नंतर आमच्या शेतजमिनीमधी सातबारा कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब न करता सातबारा फोड करण्यात आली.

या बाबत उप-विभागीय अधिकारी हदगाव यांच्याकडे अपील दाखल केले होते व संपूर्ण कागदपत्रे सादर केले उप-विभागीय अधिकारी हदगाव यांनी संपूर्ण कागदपत्रे तपासून व कायदेशीर सुनावणी घेऊन आमच्या शेतात बेकायदेशीर करण्यात आलेले फेरफार अखेर रद्द केले. आणि हिमायतनगरचे तत्कालीन पुणेकर तलाठ्याला निलबित करण्याचा प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांच्याकडे सादर केल्यानंतर कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी त्या प्रस्तावास मान्यता देऊन त्या तलाठ्यास निलंबित केले. तसेच मुख्याधिकारी नगर पंचायत हिमायतनगर यांनी सुद्धा दिनांक 21/12/2023 रोजी सदरील मालमत्तेच्या नोंदी मालमत्ता नोंदी रजिस्टर मधून रद्द केल्या आहेत.

त्यामुळे मुख्याधिकारी नगर पंचायत हिमायतनगर यांनी गैर कायदेशीर नोंदी रद्द करून रत्नाकर डावरे व चन्द्रशेखर महाजन यांच्या विरुद्ध कृतीमुळे माझ्या निष्पाप पतीला आत्महत्येस प्रवृत केल्याबदल सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. परंतु प्रभारी मुख्याधिकारी नगर पंचायत हिमायतनगर यांनी गैरकृत्य करणार्यांना पाठीशी घातले आहे. तत्कालीन अधिकारी रत्नाकर डावरे यांनी नगरपंचायत हिमायतनगर येथील काही कर्मचाऱ्यास हाताशी धरून या नोंदी केल्या होत्या. आणि सध्याचे कार्यालयीन अधीक्षक चंद्रशेखर शेषराव महाजन यांनी कोणत्याही अभिलेखाची तपासणी न करता, कोणताही रीतसर अर्ज न घेता नमूना नं 43 व सदरील मालमत्ता ह्या गावठाण मधील आहेत. म्हणून मालमत्ता नोंद प्रमाणपत्रे कोणतेही शासकीय शुल्क न आकारता गैरमागनि गैर उद्देशाने तयार करून दिले आहेत. नगरपंचायतचे अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी व संबंधित मालमत्तेचे विक्री खत करून घेणाऱ्या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून माझ्या पतीने आत्महत्या केली आहे. माझ्या पतीच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या व बेकायदेशीर विक्रीखत करून घेणाऱ्या विरुद्ध पोलीस स्टेशन हिमायतनगर ह्यांनी गुन्हा दाखल केला असून, तपास चालू आहे.

मयत परमेश्वर जाधव यांच्या नावे नगरपंचायत हिमायतनगर येथे वॉर्ड क्र 04 मध्ये मालमत्ता क्र 401.402.403,404 व 405 या बनावट नोंदी करणाऱ्या रत्नाकर डावरे आणि गैरमार्गाने व गैर उद्देशाने नमूना नं 43 व गावठाण प्रमाणपत्रे तयार करून देणारे चंद्रशेखर शेषराव महाजन यांनी केलेले कृत्य हे बेकायदेशीर असल्यामुळे त्यांच्यावर फौजदारी कार्यवाही करून सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा. किंवा मला त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन हिमायतनगर येथे फौजदारी गुन्हा दाखल करण्याची लेखी परवानगी द्यावी. आणि त्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी निवेदनातून केली आहे. मला न्याय न मिळाल्यास माझ्या पतीच्या जाण्याने उघड्यावर आलेल्या माझ्या लहान लहान लेकरांसह सहकुटुंब हिमायतनगर येथील पैनगंगा नदी मध्ये जलसमाधी घेण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही असेही देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे. या निवेदनावर मयत शेतकर्याहसा पत्नी ज्योत्सना परमेश्वर जाधव ग. परमेश्वर गल्ली, हिमायतनगर जि.नांदेड यांची स्वाक्षरी असून, या निवेदनाच्या प्रति मा. श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई (टपाल ईमेल), मा.श्री. देवेंद्र फडणवीस साहेब, उप-मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई. (टपाल ईमेल), मा.श्री. आंबादास दानवे साहेब, विरोधी पक्ष नेते महाराष्ट्र राज्य (टपाल गेल), मा. पोलीस अधीक्षक साहेब, पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड (टपाल ईमेल), मा. जिल्हा सह आयुक्त साहेब, नगर पालिका प्रशासनविभाग जिल्हाधिकारी कार्यालय (टपाल/ईमेल), मा. प्रशासक साहेब, नगर पंचायत हिमायतनगर तथा उप-विभागीय अधिकारी हदगाव साहेब, मा. तहसिलदार साहेब, तहसील कार्यालय हिमायतनगर, मा. मुख्याधिकारी, नगर पंचायत कार्यालय हिमायतनगर, मा. पोलीस निरीक्षक साहेब, पोलीस स्टेशन हिमायतनगर जि. नांदेड याना पाठविण्यात आल्या आहेत.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!