हिमायतनगर| येथील परमेश्वर जाधव या शेतकऱ्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कृतीमुळे आपले जीवन संपवले, त्यानंतर शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत तक्रार केल्याने तलाठी दत्तात्रय शाहूराव पुणेकर व मंडल अधिकारी राठोड यांचा बुधवारी 03 डिसेंबर रोजी सत्कार करण्याची निमंत्रण पत्रिका छापली. दरम्यान आज तहसीलदार यांनी संबंधित तलाठ्यावर निलंबनाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात आल्याचे पत्र देऊन आपले आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली आहे. त्या विनंतीस मान देत जाधव कुटुंबाने आंदोलन तात्पुरते मागे घेतले असले तरी न्याय नाही मिळला तर पुन्हा आंदोलन करू असा इशाराही दिला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील परमेश्वर जाधव या शेतकऱ्यांच्या नावे असलेल्या जमिनीचा त्यांच्या अडाणीपणाचा फायदा घेऊन इतर दोन जणांच्या सांगण्यावरून हिमायतनगरचे तलाठी दत्तात्रय शाहूराव पुणेकर यांनी चुकीचा फेरफार केला होता. तसेच मंडळ अधिकारी दिलीप परसराम राठोड यांनी तो मंजूर केला. आणि नगरपंचायत मधील प्रशासकीय अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक यांनी त्या शेतकऱ्यांचं नावाने असलेली मालमत्ता शेख इम्रान शेख अन्वर, मिर्जा जुनेद बेग अमीर बेग यांच्या नावाने फेर केली. त्यामुळे शेतकऱ्यांची जमीन बळकाऊ पाहणाऱ्या व्यक्तीच्या जमीन ताब्यात देण्याच्या धमक्यांना घाबरून १० जून २०२३ रोजी विषारी औषध प्राशन करून शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविली होती.
त्या बेईमान व लालची तलाठ्यावर बडतर्फी करण्याची कार्यवाहीच्या मागणीसाठी त्या तलाठ्याच्या व मंडळ अधिकाऱ्याचा बैंडबाजा लावून आज दि.०३ जानेवारी रोजी सत्कार आयोजित केला होता. त्या सत्कार कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका जाधव कुटुंबाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवून तलाठी व मंडल अधिकाऱ्याच्या सत्काराच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ईमेल पाठवला होता. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार तलाठी दत्तात्रय शाहूराव पुणेकर ज्यांनि चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्याच्या नावाची जमिनीचा इतरांच्या नावाने परस्पर फेरफार करून फसवणूक केला होती. त्या तलाठ्यावर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली असल्याचे पत्र आंदोलनकर्त्यास देऊन आयोजित केलेला सत्कार कार्यक्रम रद्द करावा. आंदोलन मागे घ्यावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासन केले होते.
त्यामुळे आज बुधवारी हिमायतनगर येथे होणाऱ्या त्या तलाठ्याच्या सत्काराचा कार्यक्रम पीडित शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या वतीने हा कार्यक्रम काही दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार बेकायदेशीरपणे काम करणाऱ्या तलाठ्या विरुद्ध बडतर्फीची कार्यवाही करून आमच्या मागण्या पूर्ण न केल्यास पुनः आम्ही त्यां तलाठ्याला सेवेतून कायमस्वरूपी काढून टाकून फौजदारी कार्यवाही करण्याची मागणीसाठी पुन्हा हे आंदोलन उभारू असा इशारा दिला आहे. जो पर्यन्त संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा फौजदारी गुन्हा नोंद होणार नाही व त्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करणार नाहीत तो पर्यंत मागे हटणार नाही लवकरच महसूल मंत्री व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटू घेऊ असेही पत्रकारांशी बोलताना संगितलें आहे.