नांदेडमहाराष्ट्र
मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांची जिल्हा परिषदेच्या विभागांना भेट
प्रशासन अधिक कार्यक्षम करण्याच्या सूचना

नांदेड| जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी आज जिल्हा परिषदेतील सर्व विभागांना भेटी देऊन पाहणी केली.
यावेळी त्यांनी विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत प्रशासन अधिक कार्यक्षम व सुव्यवस्थित करण्याच्या सूचना दिल्या. याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक बालाजी नागमवाड यांची उपस्थिती होती.
मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी कार्यालयातील स्वच्छता, सिक्स बंडल पद्धतीने फाईल्स व रेकॉर्ड ठेवणे तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याने आपला जॉब चार्ट लावावा यामुळे जिल्हा परिषदेचे कामकाज अधिक प्रभावी व पारदर्शक होईल असे त्यांनी सांगितले.
