क्राईमनांदेड

पोलीस ठाणे ईतवारा, नांदेड येथील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणल्याची कार्यवाही

नांदेड। श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक यांनी चोरी घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणे व गुन्हयांना प्रतिबंधक करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे अधिकारी व अंमलदार यांना आदेशीत केले होते.

पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री अबिनाशकुमार साहेब, उप विभागिय पोलीस अधिकारी श्री सुशिलकुमार नायक साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री रणजित भोईटे, पोउपनि श्री आर.बी. चौधरी यांनी पो.स्टे. ईतवारा गुरनं. 49/2024 कलम 457,380 भादेवी गुन्हयात अज्ञात असलेले आरोपी 1 राजु पिता श्रावण पवार वय 23 वर्षे, व्यवसाय टाईल्सकाम राहणारा ब्रम्हपुरी चौफाळा नांदेड 2. शेख समीर पिता शेख चाँद, वय 23 वर्षे, व्यवसाय मजुरी राहणार वाजेगांव ता. जि. नांदेड याना ताब्यात घेवुन अटक करुन मा. न्यायालयाकडुन पोलीस कोठडी घेण्यात आली. अटक आरोपींकडुन गुन्हयातील गेला मालापैकी मालापैकी सोन्याचे शॉर्ट गंठन, सोन्याची अंगठी व चांदीचे चैन जोड दोन नग असा एकूण 50,000/- रुपयाचा ऐवज हस्तगत केला आहे व गुन्हा उघडकीस आणला आहे. अटक आरोपीचा साथीदार आरोपी सय्यद अरिफ सय्यद फारुख रा. गाडीपुरा नांदेड हा निष्पन्न केला आहे.

तसेच पो.स्टे.ईतवारा गुरनं. 29/2024 कलम 457,380 भादवी गुन्हयात अटक आरोपी राजु पिता श्रावण पवार वय 23 वर्षे, व्यवसाय टाईल्सकाम राहणारा ब्रम्हपुरी चौफाळा नांदेड असल्याचे निष्पन्न करुन नमुद गुन्हयात गेला माल पाण्याची टाकी, प्लेट, पाण्याची मोटार, खुर्ची असा एकुण 9,200/- रुपयाचा ऐवज हस्तगत केला आहे. सदर आरोपींकडुन दोन्ही गुन्हयातील एकुण 59,200/- रु.चा ऐवज हस्तगत केला आहे.

सदर कार्यवाहीत पोलीस निरीक्षक श्री रणजित भोईटे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि श्री चौधरी ASI बी.एन. गजभारे, डिबी. बिसाडे, पोहेकॉ/664 मोहन हाके, पोहेकॉ/436 एकनाथ मोकले, पोना /2543 हबीब चाऊस, पोना/1809 मिलींद नरबाग, पोना /2556 लक्ष्मण दासरवार, पोना/2117 धिरज कोमुलवार पोकों /2908 काकासाहेब जगताप, पोकों/471 नजरे आजम देशमुख, पोकों/2890 कोरनुळे, पोकॉ/493 गायकवाड, पोकॉ/3065 राठोड यानी कर्तव्य पार पाडले आहे.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!