क्राईमनांदेड

स्थानिक गुन्हे शाखेकडुन 58,970/- रुपयाचा 9 किलो 772 ग्राम गांजा जप्त, एक आरोपी ताब्यात

नांदेड। पोलीस ठाणे बारड हद्दीमध्ये मौजे नागेली ता. मुदखेड शिवारात एका शेतामध्ये एन डी पी एस कायदयाच्या तरतुदीचा भंग करुन अंमली पदार्थ गांजाचे झाडाची लागवड करुन जोपासलेली आहेत अशी खात्रीशिर माहीती स्थागुशाचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांना मिळाली.

मिळालेली माहीती वरीष्ठांना देवुन त्यांचे आदेशाने स्थागुशाचे पोलीस अमंलदार, महसुलचे राजपत्रीत अधिकारी यांना सोबत घेवुन दिनांक 16/05/2024 रोजी मिळालेल्या माहीतीचे ठिकाणी, मौजे नागेली ता. मुदखेड शिवारात गट नंबर 70 मधील शेतात उसाचे पिकात एकुण 52 लहान मोठे गांजाचे झाडे व गांजाचे पावडर असा एकुण 9 किलो 772 ग्राम लागवड करुन जोपासलेली.

असा एकुण किंमती 58,970/- रुपयाचे मिळुन आल्याने आरोपी नामे साहेबराव रकमाजी गव्हाणे वय 55 वर्ष व्यवसाय शेती रा. वारड ता. मुदखेड जि. नांदेड याचेविरुध्द पोलीस ठाणे बारड येथे गुरनं. 35/2024 कलम 20 (अ) (ब) NDPS ACT प्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक श्री संतोष शेकडे यांचे फिर्यादवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, उदय खंडेराय, पो. नि. स्थागूशा नांदेड, नायब तहसीलदार/ विजयकुमार पाटे, सपोनि / संतोष शेकडे, संतोष कैदासे, सपोउपनि / माधव केंद्रे, पोह/ गुंडेराव करले, सखाराम नवघरे, पोना/संजिव जिंकलवाड, किशन मुळे, पोकॉ/ देवा चव्हाण, चालक पोकों/गंगाधर घुगे, कलीम शेख बालाजी मुंडे स्थागुशा, नांदेड यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!