हिमायतनगर। मानसानी काय करावे, काय करू नये तसेच कशासाठी जगायचं याची जान आणि भान राष्ट्रीय सेवा योजनेतून निर्माण होते. राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो. आजचा तरुण हा समाजहित व देश सेवेसाठी सदैव तत्पर असावा आणि उद्याचा जबाबदार नागरिक घडावा. असे आपले सविस्तर मत वेगवेगळी उदाहरणे आणि दृष्टांत देऊन विद्यार्थ्यांना पठवून दिले. विध्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात योगा व मेडिटेशन ची नितांत आवश्यकता असते. असे सांगताना महामानवाच्या जिवन कार्याचा आदर्श आजच्या तरुणांनी घ्यावा असा मोलाचा संदेश नांदेड येथून आलेले कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे प्रो. अजय गव्हाणे यांनी दिला.
हुतात्मा जयवंतराव महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय विशेष निवासी शिबिर मौजे मंगरुळ ता. हिमायतनगर जि . नांदेड येथे रविवार दि. 11 फेब्रुवारी ते शनिवार दि. 17 फेब्रुवारी 2024 यादरम्यान आयोजित करण्यात आले आहे. सोमवार दि. 12 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम ह्या होत्या. तर प्रमुख उद्घाटक व मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध व्याख्याते डॉ. अजय गव्हाणे हे लाभले होते. मंचावर प्रमुख उपस्थिती म्हणून गावचे प्रथम नागरिक सरपंच यांचे प्रतिनिधी बालाजी पावडे तसेच तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष गलझरवाड, उपसरपंच संतोष अंबेकर, पोलीस पाटील पवन जयस्वाल, शाळेचे मुख्याध्यापक पोपलवार, स्टाफ सेक्रेटरी डॉ. डी.के. कदम, नॅक समन्वयक डॉ. गजानन दगडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे आदींची उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी व वीर हुतात्मा जयवंतराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तद्नंतर मंचावरील मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो चे कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे यांनी केले. मंचावरील मान्यवरांपैकी उपसरपंच संतोष आंबेकर व मुख्याध्यापक पोपलवार सर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करत असताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे ध्येय उद्दिष्ट पटवून सांगत असताना विद्यार्थ्यांचे सामाजिक उत्तरदायित्व साधण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कसे उपयोगी असते. याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन इतिहास विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. वसंत कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे सहकार्यक्रमाधिकारी अधिकारी डॉ. एल. बी. डोंगरे यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाचा संपूर्ण स्टॉप तसेच कार्यालयीन कर्मचारी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक, शाळेतील विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विध्यार्थी विद्यार्थ्यिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.