
नायगाव, रामप्रसाद चन्नावार| ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कूल खैरगाव येथे तालुकास्तरीय ५१ वे विज्ञान प्रदर्शन 2023 चे आयोजन. शिक्षण विभाग पंचायत समिती नायगाव खैरगाव व ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कूल खैरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय ५१ वे विज्ञान प्रदर्शन सन 2023 चे आयोजन ग्रीन व्हॅली स्कूल मध्ये आज दिनांक 14 /12/2023 गुरुवार सकाळी ठीक 09:30 ते 03:00 या वेळात करण्यात आले.

या विज्ञान प्रदर्शनाचे मुख्य उद्घाटक मा.श्री नंदकुमार काकडे ( गटशिक्षणाधिकारी ) केंद्रप्रमुख श्री .शिवराज साधू सर, यांनी केले. याप्रसंगी सौ. सरोज धरणे ( प्राचार्या ग्रीन व्हॅली ) श्री.रेनगुंटवार सर श्री.कपिलेश्वर नलबलवार सर,मुजाहीद शेख सर ( कार्यप्रमुख ) श्री.उद्धव ढगे सर,कपिल गारटे सर, रेडेवाड माधव, चिकलवाड सर उपस्थित होते. या प्रसंगी मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तर भेदेकर सर यांनी स्वागत गीत प्रस्तुत केले. डॉ. मा. श्री आशिष मोकाटे सर (विज्ञान विभाग प्रमुख GVIS ) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले मा.शिवराज साधू सरांनी विज्ञान प्रदर्शन आणि शालेय शिक्षण विभागाची भूमिका या विषयावर आपले मत व्यक्त केले तर मा. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी याप्रसंगी विज्ञान हा जीवनाचा अविभाज्य भाग कसा आहे? याविषयी आपले मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. नवनाथ वरवटे सर यांनी केले मान्यवरांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाची सुरुवात फित कापून करण्यात आली. या प्रदर्शनात नायगाव तालुक्यातील विविध माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प सादर केले ज्यात माध्यमिक स्तरातून 20 तर प्राथमिक गटातून 32 प्रकल्प सहभागी झाले. या विज्ञान प्रदर्शनाचा एक नवोपक्रम म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ या विषयावर एकूण 18 शाळांनी आपला प्रयोग सादर केला.
या विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून मा. मुदखेडे सर,मा. चिखले सर, आवेज सर श्री.नितीन सुलेगावकर सर आणि मा.भोसले सर यांनी अत्यंत सुयोग्य निरीक्षणासह आपले परीक्षण नोंदवले. प्राथमिक गटातून प्रथम* पारितोषिक कु.सानवी संतोष कल्याण (गुरुकुल पब्लिक स्कूल नायगाव), द्वितीय पारितोषिक कु.शेख साकिब (ओयासिस इंग्लिश स्कूल कुंटूर), तृतीय पारितोषिक कु.प्रतीक्षा संतोष पोटफोडे (नराशाम महाराज विद्यालय रातोळी) या शाळांनी पटकावले. तर माध्यमिक गटातून प्रथम पारितोषिक कु.विशाल कदम (ब्लू बेलस् इंग्लिश स्कूल नायगाव), द्वितीय पारितोषिक कु.वैष्णवी काळे (जनता हायस्कूल नायगाव) आणि तृतीय* पारितोषिक कु.सृष्टी गुणवंत कदम (ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कूल खैरगाव) या शाळांनी पटकावले.
तर टाकाऊ पासून टिकाऊ या विषयावर प्रथम पारितोषिक जिल्हा परिषद हायस्कूल सुजलेगाव, द्वितीय पारितोषिक यमुनाबाई भाऊराव पाटील विद्यालय नायगाव तर तृतीय पारितोषिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इज्जतगाव या शाळांनी पटकावला. या प्रदर्शनाचे सुयोग्य नियोजन ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कूल खैरगाव संस्थेचे सचिव मा. कुमुदकांत पटेल सर यांच्या मार्गदर्शनाने, शाळेच्या प्राचार्य सौ सरोज धरणे, पर्वेक्षक आनंद पांचाळ सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख अर्जुन बैस सर आणि त्यांच्या टीमने केले.
