
नांदेड। नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील मृत्यूच्या घटनेची उच्च न्यालयाने दखल घेतली आहे. परणौ सरकार यावर काहीच बोलत नाही. तुमच्याकडे आमदार खरेदीसाठी खोके आहेत, मात्र औषधीसाठ्यासाठी नाहीत अशी टीका करत युवा सेने प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
यावेळी माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले कि, कोविड सारख्या महामारीच्या काळात जीव धौक्यात घालून याच आरोग्य यंत्रणांनी काम केले आहे. त्यामुळे देशात नव्हे जगभरात महाराष्ट्राचे नाव झाले आहे. मग आताच्या या मृत्यू तांडवावर यंत्रणेला दोष कसा देता? औषधी, डॉक्टर, ‘परिचारिकांची रिक्त पदे ही त्याला कारणीभूत आहेत. त्यामुळे जबाबदारी निश्चित करून मंत्र्यांचे राजीनामे घ्या. तसेच नेमक्या काय उपाययोजना केल्यास भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, यावरही चर्चा करा. जीवतोड़ काम करणाऱया डॉक्टरांवर कार्यवाही नको असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
रिक्त पदाची संख्या वाढतच चालली आहे. हि पदे अद्याप भरली गेलेली नाहीत. चौकशीसाठी समिती बसविली जाईल समितीच्या अहवालानंतर जीव तोडून काम करणाऱ्यांवर डॉक्टरांवर कारवाई करण्यापेक्षा त्यांनी राजीनामे द्यायला पाहिजेत. या घटनेला दहा दिवस झाले तरी, अद्याप मुख्यमंत्र्यांना विष्णुपुरी रुग्नालयाकडे यायला वेळ मिळाला नाही. आम्हाला राजकारण करायचे असते तर मोर्चे आंदोलने काढले असते. परंत्तू पुन्हा सह्या घटना घडणार नाहीत यासाठी काय करायला पाहिजे यावर चर्चा होणे गरजेचे असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानदे, खा.विनायक राऊत, संपर्क प्रमुख बबन थोरात, माजी खा. सुभाषराव वानखेडे, सहसंपर्कप्रमुख दत्त कोकाटे, आदींसह नांदेड जिल्ह्यातील शिवेना पडदाहिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
