मोदी सरकारची हमी…आमचा संकल्प विकसित भारत रथाचे हिमायतनगर शहरात आगमन

हिमायतनगर,अनिल मादसवार| मोदी सरकारची हमी…आमचा संकल्प विकसित भारत रथाचे हिमायतनगर शहरात शनिवारी आगमन झाले. या रथाचे आगमन शहरातील पोलीस ठाणे परिसरात होताच भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गजानन अण्णा तुप्तेवार यांच्या हस्ते उदघाटन करून २०२४ कैलेंडर वितरित करण्यात आले. त्यानंतर उपस्थित नागरिकांना भारत सरकारतर्फे नागरिकांसाठी केल्या जात असलेल्या योजनांची माहिती एलइडी च्या माध्यमातून देण्यात आली.
विकसित भारत संकल्प यात्रेला 2 महिने पूर्ण झाले आहेत. या प्रवासात धावणारा विकासाचा रथ हा श्रद्धेचा रथ असून आता लोक त्याला हमीचा रथ देखील म्हणू लागले आहेत. योजनांच्या लाभापासून कुणीही वंचित राहणार नाही, कुणीही लाभ मिळाल्या वाचून राहणार नाही, असा विश्वास निर्माण व्हावा यासाठी मोदी सरकारची हमी, आपला संकल्प विकसित भारत रथ आज हिमायतनगर येथे दाखल झाला होता. रथाच्या माध्यमातून नगरपंचायतीचे हंडीकरी कर्मचारी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संदेश शहरात पोचविले आहे.
शहरात शनिवारी सकाळी १० वाजता या रथाचे उदघाटन पोलीस स्टेशन नजीक भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गजानन अण्णा तुप्तेवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती असलेल्या कॅलेंडरचे देखील अनावर उपस्थितांच्या हस्ते करून वितरण करण्यात आले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष गजानन चायल, माजी तालुकाध्यक्ष आशीष सकवान, भाजप युवा मोर्च्याचे माजी तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी, शिवसेनेचे बाळू अण्णा चवरे, भाजपचे लक्ष्मण डांगे, निक्कु ठाकूर, आदिंसह नगरपंचायत अधिकारी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
या रथातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी राबविलेल्या योजनांची माहिती सहचित्र दाखविण्यात आली आहे. विकसित भारत संकल्प यात्रेतुन प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा दृष्टिकोन असून, या दरम्यान आयुष्मान कार्ड, पीएम किसान योजना प्रत्येकाला पोषण, आरोग्य आणि उपचार, प्रत्येक कुटुंबाला कायमस्वरूपी घर मिळावे, प्रत्येक घरात गॅस जोडणी, पाणी, वीज आणि शौचालयाची सुविधा असावी, स्वच्छतेची व्याप्ती वाढवण्याचा, प्रत्येक गल्लीबोळ, प्रत्येक भाग, प्रत्येक कुटुंब त्यात सहभागी, प्रत्येकाचे बँक खाते असावे, स्वयंरोजगारात पुढे जाण्याची संधी मिळावी. यासह विविध संकल्पनेच्या माध्यमातून देशाला पुढे नेण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न असल्याची हमी रथाच्या माध्यमातून दिली जात आहे.
