नांदेडराजकिय

विनोद कांचनगीरे यांच्यी नांदेड शहर जिल्हा काॅग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदी निवड

नवीन नांदेड| नादेड शहर जिल्हा काॅग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी विनोद कांचनगीरे यांच्यी नियुक्ती करण्यात आली असून या निवडीचे पत्र माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले. विनोद कांचनगीरे यांनी वाघाळा शहर ब्लॉक काॅग्रेस कमिटी अध्यक्ष पदी असतांना केलेल्या उलेखनीय कार्याची नोंद घेऊन व वेळोवेळी आंदोलने व विकासात्मक कामात अग्रेसर राहुन केलेल्या कार्याची नोंद घेऊन त्यांची नांदेड शहर जिल्हा काॅग्रेस कमिटी उपाध्यक्ष पदाची नियुक्ती केली आहे.

सदरील नियुक्ती नानाभाऊ पटोले, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी, व माजी अशोकरावजी चव्हाण, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र प्रदेश, यांच्या निर्देशानुसार आपली नांदेड शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेड शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष म्हणून पक्षाच्या ध्येय व धोरणानुसार काम करावे, तसेच सर्व समाजाच्या व जाती धर्माच्या घटकांना सोबत घेऊन कॉंग्रेस पक्षाचे विस्तार करुन पक्ष मजबूत करावे असे नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले असून सदरील नियुक्ती पत्र अमरनाथ राजुरकर माजी आमदार प्रदेश उपाध्यक्ष तथा महानगराध्यक्ष नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी दिली आहे . या निवडीबद्दल मित्र मंडळ यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!