हिमायतनगर| तालुक्यातील मौजे रमणवाडी जि. नांदेड येथील शेतकरी सुदाम शामराव जाधव यांच्या मुलीने रमणवाडी तांड्यावरील पवन उर्फ राजु सुभाष आडे, यांच्या सततच्या त्रासाला व धमक्याला कंटाळून 11 जानेवारी रोजी राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला मात्र अजूनही आरोपी अटक झाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्याने मुलीच्या आत्महत्या व मृत्युला कारणीभुत असणाऱ्या आरोपीला तत्काळ अटक करा नाहीतर तहसिल कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. घटना घडून २० दिवस लोटून गेले असताना अद्यापही आरोपी फरार असल्याने शेतकऱ्याने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे.
याबाबत सावचित्तर वृत्त असे कि, कि हिमायतनगर तालुक्यातील मौजे रमणवाडी येथील आरोपी पवन उर्फ राजु पिता सुभाष आडे, यांनी सुरुवातीला मयत मुलगी जयश्री पिता सुदाम जाधव, हिला लग्नाचे आमीष दाखवुन प्रेम अनैतिक संबंध प्रस्थापित केले. त्याचे कुंटुंबातील वडील सुभाष देवला आडे, व चुलता दिलीप धावजी आडे, व त्यांचा मुलगा सोनु दिलीप आडे यांनी दि. 09/11/2024 रोजी माझी मुलगी ही शेताला जात असतांना तिला रस्त्यात अडवुन तु आमच्या मुलाचे पाठीमागे का लागली आहे. म्हणुन तु तुला पेट्रोल टाकुन जिवनाशी खतम करण्याची जाळुन टाकण्याची धमकी दिली होती.
त्यावेळी मयत युवतीचे आई वडील शेतात काम करीत असता वेळी मुलगी जयश्री हिने घाबरलेल्या अवस्थेत रडत रडत येवुन घडलेली घटना आईला सांगितली. यावेळी आई वडिलांनी तिला समजुन घालुन शांत केले व परत आले. दि. 11/01/2024 रोजी (गुरुवारी) शेतकरी कुटुंब शेतात काम करण्यासाठी गेलो असता मुलगी एकटीच घरी होती. तिने प्रियकराच्या भिती पोटी व वारंवारच्या त्रासामुळे व त्याचे धमकीमुळे वैतागुन (कंठाळुन) घराच्या लोखंडी अंगलला अंगावरच्या ओठनीने गळफास घेवुन आत्महत्या करुन जीवनयात्रा संपून घेतली. सदर घटनेची माहिती हिमायतनगर येथील पोलिस स्टेशनला दिली असता पोलिस निरीक्षक बि.डी. भुसनुर, व त्याचे महिला पोलिस उपनिरीक्षक व इतर पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी येवुन प्रेताचा पंचनामा व शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर येथे करुन सदरचे प्रेत कुटुंबाच्या ताब्यात दिले. यावेळी मयत मुलीच्या मातापित्याने डेडबॉडी (प्रेत) घेण्यास तयार नव्हते. त्यावेळी मुलीच्या आत्महत्या व मृत्युला कारणीभुत असणाऱ्या आरोपीला जो पर्यत अटक करणार नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही. असा पवित्र घेतला होता.
त्यावेळी पोलिस निरीक्षक भूसनुर यांनी नातेवाईकांची फिर्याद नोंदवुन घेऊन पवन उर्फ राजु सुभाष आडे, सुभाष देवला आडे, दिलीप धावजी आडे, सोनु दिलीप आडे, यांच्या विरुध्द कलम 306, 34 भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला. तसेच आरोपींना 2 दिवसात अटक करण्याचे अभिवचन दिल्यामुळे नातेवाईकांनी मयत मुलीचे प्रेत ताब्यात घेऊन अंत्यविधी उरकून घेतला. परंतु आजपावेतो मुलीच्या मत्यूसी कारणीभूत असलेल्या आरोपींना हिमायतनगर पोलिसांनी अटक न केल्यामुळे संपूर्ण कुंटूंब दि. 01/02/2024 रोजी यातील गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी आपल्या तहसिल कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदन पोलिसांनी दिले. यावेळी पोलिसांनी दोन दिवसाची मुदत मागितली असून, जर यातील आरोपीना अटक झाली नाहीतर तर आम्ही आमरण उपोषणाला बसणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
तहसीलदार याना देण्यात आलेल्या निवेदनावर 1. सुदाम शामराव जाधव, (मयताचे वडील), 2. सौ.अनीता सुदाम जाधव, (मयताची आई), 3. शामराव लोका जाधव, (आजोबा) , 4. अनिल शामराव जाधव, (काका) , 5. कुरमाबाई अनिल जाधव, 6. संजय शामराव जाधव, 7. प्रकाश लोका जाधव, 8. रमेश लोका जाधव, 9. वसंत नारायण जाधव (उपसरपंच), 10. रामराव लोका जाधव, 11. आकाश प्रकाश जाधव, आकाश सुदाम शामराव जाधव, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवेदनाच्या प्रति त्यांनी गृहमंत्री साहेब, मंत्रालय मुंबई , जिल्हा पोलिस अधिक्षक साहेब, नांदेड, जिल्हाधिकारी साहेब, नांदेड, उपविभागिय पोलिस अधिकारी साहेब, भोकर, पोलिस निरीक्षक साहेब, पो.स्टे. हिमायतनगर व सर्व पत्रकार बांधव याना दिले आहे.