क्रीडानांदेड

17वी महाराष्ट्र राज्य ज्युनियर नेटबॉल स्पर्धेत प्रथम पारितोषक मुलीमध्ये व मुलांमध्ये भंडारा जिल्हा

नांदेड| नांदेड जिल्हा नेटबॉल असोसिएशनच्या वतीने शंकराव चव्हाण सभागृह जवळील ईडोर हॉल येथे दि.28 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत 17 वी महाराष्ट्र राज्य ज्युनिअर नेटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी दि. 30 नोव्हेंबर 2023 रोजी या स्पर्धेचे बक्षीस वितरण जिल्हा क्रीडा अधिकारी संजय बेतेवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी राज्य संघटनेचे सहसचिव श्याम देशमुख, राज्य संघटनेचे सदस्य सतीश इंगळे, जिल्हा संघटनेचे सचिव प्रवीणकुमार कुपटीकर, आयोजन समितीचे अध्यक्ष सारिका बकवाड, संघटनेचे सहसचिव रविकुमार बकवाड आदी उपस्थित होते.

या स्पर्धेचे मुलांमध्ये भंडारा जिल्ह्याने प्रथम पारितोषिक पटकाविले, गोंदिया जिल्ह्याने द्वितीय पारितोषिक पटकाविले, परभणी जिल्ह्याने तृतीय पारितोषिक पटकाविले तर मुलींमध्ये भंडारा जिल्ह्याने प्रथम पारितोषक पटकाविले धुळे जिल्ह्याने द्वितीय पारितोषिक पटकाविले नांदेड जिल्ह्याने तृतीय पारितोषिक पटकाविले. या स्पर्धा यशस्वी करण्यात करिता स्पर्धेचे पंच प्रमुख स्नेहादीप कोकाटे दिलीप सूर्यवंशी, सुमित गायकवाड, चंदन गायकवाड , मारुती मोरे ,सुशांत ठाकूर , अभिनव दुधमल,प्रतीक्षा सोनकांळे, प्रीती लोखंडे, यश गायकवाड, आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!