क्राईमनांदेड

हिमायतनगर येथील भारतीय स्टेट बँकेतून ४१ हजारांची रक्कम चोरीला

हिमायतनगर| हिमायतनगर येथील भारतीय स्टेट बॅंक शाखेत मायक्रो फायनान्स कंपनीची वसूली रक्कम भरण्यासाठी लाईनमध्ये उभे असलेल्या एका व्यक्तीच्या पाठीमागील कोण्यातरी अज्ञात व्यक्तीने बैगेची चैन काढून वरील 41 हजार 460 रूपयाची रक्कम लंपास केली आहे. या घटनेमुळे ग्राहकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले ,असून वारंवार बैंकेतून अशी रक्कम चोरी होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी सुरक्षा गार्ड नेमण्यात आल्यानंतर देखील बैंकेतून चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे.

आकाश भगवान जोगदंड वय 24 वर्ष व्यवसाय खाजगी नोकरी रा. गोडवडसा ता. माहूर जि. नांदेड हा. मु. रेल्वेस्टेशन रोड हिमायतनगर हे नेहमीप्रमाणे भारत मायक्रो फायनान्स कंपनीचे वसूल झालेली ४ लक्ष ६१ हजार चारशे साठ रूपयांची रक्कम भरण्यासाठी भारतीय स्टेट बैंकेत गेले होते. बुधवार आठवडी बाजार असल्याने बैंकेत गर्दी होती. गर्दीचा फायदा घेत दि. ३ बुधवारी रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास जोगदंड रक्कम डिपॉझिट करण्यासाठी लाईनमध्ये उभे होते.

दरम्यान यावेळी त्यांच्या पाठीमागील बँगेमधुन ४१हजार चारशे साठ रू. नजर चुकवून गर्दीचा फायदा घेवून कोणीतरी अज्ञात चोरट्याने अलगदपणे काढून चोरून नेले आहे. हा प्रकार रक्कम काउंटरवर गेले असता त्यातील रक्कम गायब झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा प्रकार भारतीय स्टेट बैंकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, जोगदंड यांनी हिमायतनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पो. काॅ.श्याम नागरगोजे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!