अर्थविश्वनांदेड

नांदेड हिवताप कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुभाष कल्याणकर, सचिव सुरेश आरगुलवार यांची बिनविरोध निवड

नांदेड| महाराष्ट्र राज्य हिवताप कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नांदेड यांची आज दि.१ डिसेंबर २०२३ रोजी पतसंस्थेच्या मगनपुरा येथील कार्यालयात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व पंच यांची निवड प्रक्रिया प्राधिकृत अधिकारी अनिल घोगरे यांच्या मार्फत राबविण्यात आली. विकास सहकारी पॅनल प्रमुख सुभाष कल्याणकर यांची दुसर्‍यांदा चेअरमन पदी निवड, सचिव पदी सुरेश आरगुलवार, उपाध्यक्ष पदी देविदास पेंढारकर व पंच पदी माणिक गिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी नवनिर्वाचित संचालक पप्पू देसाई नाईक, अशोक ढवळे, मोहन पेंढारे, विठ्ठल मोरे यांनी निवड प्रक्रियेत भाग घेतला. नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या निवड बदल शुभेच्छा देताना चंद्रभान धोंडगे, सत्यजीत टिप्रेसवार, व्यंकटेश पूलकंठवार, बालाजी आळणे,व्यंकटी बकाल, गणेश ताडेवाड, वनराज कदम, उत्तम कराड, माधव ईटकापल्ले, सुरेश पिंपळगावकर,शंकर चव्हाण, महेश सातारे, किरण कुलकर्णी सभासद व कर्मचारी पतसंस्थेचे लिपिक कैलास मोरे, श्रीमती मंगलबाई वानखेडे उपस्थित होते.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!