उमरखेड,अरविंद ओझलवार। आयुष्यात जीवन जगतांना आजकालच्या धावपळीच्या स्पर्धेत आपण स्वतःला विसरून चाललो आहोत.मी म्हणून खुपकाही आहो अशी अहंभावना आपल्या मनात कधीही न ठेवता मार्गक्रमण केल्यास यश आपल्या दुर जात नाही. संकट तर माणसाला पुरून उरलेत तरी संकटाशी सामना करीत आपली वाटचाल जीवनभर करावी,शायरी, लिखाण, कविता, गीत संगीत हे छंद जोपासले पाहीजेत, यातून आपल्याला नवीन उभारी मिळून ताणतणावातून मुक्ती मिळते,संगीत हे उर्जास्त्रोत असून त्यातून एक वेगळीच उर्जा मिळते असे प्रतिपादन उमरखेड पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री.शंकर पांचाळ साहेब यांनी केले. उमरखेड येथे श्री.स्वामीसमर्थ कला मंच आयोजित भारत रत्न,स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर स्मृतिदिनानिमित्त सुर संगीत”म्युझिकल ग्रुपच्या संगीत रजनी कार्यक्रमात ते बोलत होते.
आम्ही कर्तव्यावर असतांना अनेक अडचणींना सामोरे जाऊन आम्हाला सामना करावा लागतो त्यामुळे संगीतातले शब्द गुणगुणले तरी वाढत्या ताणतणावापासून मुक्ती मिळते गीत संगीत हे उर्जास्त्रोत आहे असे सांगत जुन्या आठवंणींना उजाळा देऊन “गारवा” या अल्बम मधील गारवा वा-यावर भिरभिर पारवा नवा नवा…….हे गीत आपल्या सुरेल आवाजात सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले, उमरखेड तहसीलचे कर्तव्यदक्ष नायब तहसीलदार पंधरे साहेब, गणेश शिवनकर, गजेंद्र गाडेकर यांच्या हस्ते माता सरस्वती प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन करून गायिका मयुरी राठोड यांच्या आवाजातील मन मेरा मंदीर शिव मेरी पुजा या गीताने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली, नायब तहसीलदार श्री. पंधरे साहेब यांनी कोरा कागज था ये मन मेरा, जीवन से भरी तेरी आंखे हे गीत सादर करून कार्यक्रमात रंगत भरली, गायक श्रीकांत शहा यांनी आजकल याद कुछ और रहता नही, मुझे पिने का शौक नही, कागज कलम दवात ला, जिंदगी इम्तिहान लेती है असे गीत सादर करून रसिकांची वाहवाह मिळवली.
गजेंद्र गाडेकर यांनी तेरे मेरे बिच मे कैसा हे ये बंधन अन्जाना,गणेश शिवनकर यांनी आर.डी. बर्मन, बप्पी लाहीरी संगीत मिक्स गीत सादर करून धम्माल उडवली ,बचना ऐ हसिंनो लो मै आगया या गीतावर मिथुन चक्रवर्ती फेम डान्स करत सुनिल देशपांडे यांनी प्रेक्षकांना त्याकाळातील डिस्को डान्सरचा अनूभव दिला, क्या खुब लगती हो, बेखुदी मे सनम,युही तुम मुझसे बात करती हो.. असद खान पठाण, तेरी बंजारन रस्ता देखे, हमने सनम को खत लिखा, दिल के अरमा…मिना पवार,लैला ने कहा जो मजनू से, राहुल चिरडे,अश्विनी चंदनकर, यांनी एकापेक्षा एक लोकप्रिय गीत सादर करत कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत नेला, दुष्यंत लोमटे यांना ओ हंसिनी मेरी हंसिनी, के.सन्स टेलर यांना पल पल दिल के पास तुम रहती हो या गीतासाठी सुर संगीत” म्युझिकल ग्रुपने त्यांना मंचावर गायनाची संधी दिली.
गाझी मास्टर यांनी अतिशय दमदार शेरोशायरी करत प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट मिळवला शेवटी तेरी इस अदा पे सनम…ह्रदयी वसंत फुलतांना… देशभक्तीपरगीत मेरा चना है अपनी मर्जी का… तेरे दर को छोड चले… गायक दयानंद खंदारे यांनी गायलेल्या या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.याप्रसंगी शहरातील संगीत प्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहुन कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.