हिमायतनगर। येथील राजा भगीरथ विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे, येथे शिकविल्या जाणाऱ्या संस्कृत विषयात 2 विद्यार्थ्यांनी 100 गुण तर 15 विद्यार्थ्यांनी 99 गुण संपादन करून घवघवीत यश मिळवले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जाते आहे.
Nep राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी चालू शैक्षणिक वर्षांपासून होणार असून, सदरील या अभ्यासक्रमात मनाचे श्लोक, भागवत गीता चा समावेश असणार आहे, सदरील संस्कृती संवर्धनाचे काम हिमायतनगर येथील राजा भगीरथ विद्यालयात केले जाते आहे. संस्कृत विषयाच्या माध्यमातून गेल्या 15 वर्षांपासून संस्कृत शिक्षिका सौ माया उत्तरवार (तगलपल्लेवार) या करत असून, गेल्या 5 वर्षांपासून संस्कृत शिक्षिका सौ उत्तरवार यांच्या मेहनतीने 100 पैकी 100 गुण मिळविण्याची मालिका सुरू आहे.
यावर्षी देखील ग्रामीण भागातील विद्यार्थी चंद्रकांत गड्डमवार. आदेश पांचाळ या 2 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळविले तर 1. ऐश्वर्या शाम तुप्तेवार, 2. धनश्री प्रकाश देवराय, 3. आरती तुलसीराम वाघमारे, 4. ममता अमोल जाधव, 5. सविता लक्ष्मण हेंद्रे, 6. श्रुती वानखेडे, 7. सुनाक्षी सूर्यवंशी, 8. ऋषिकेश जाधव, 9. रिया सावळकर यां 15 विद्यार्थ्यांनी संस्कृत या विषयात 100 पैकी 99 गुण मिळवुन संस्कृत विषयावर प्राविण्य मिळविले आहे. या यशाबद्दल उत्तरवार मैडम व यशस्वी विद्यार्थ्यांच राजा भगीरथ शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक आर एन सागर, पर्यवेक्षक व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व शिक्षणप्रेमी पालक वर्गातून केले जाते आहे.