उस्माननगर| भाजपाचे नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे विश्वासु व प्रमाणिक , तळमळीने काम करणारे आणि पंचक्रोशीतील सर्वांचे लाडके आवडते मामा म्हणून परिचित असलेले तेलंगवाडी ता.कंधार येथील माजी सरपंच भाजपचे सक्रिय कार्यकर्ते सुरेश मामा बास्टे यांची पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या तालुका उपाध्यक्ष म्हणून निवड केल्याचे पत्र लोहा विधानसभा मतदारसंघ संघाचे भावी आमदार प्रविण पाटील चिखलीकर व भाजपचे तालुकाध्यक्ष प्रा. किशनराव डफडे यांनी निवड केल्याचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे.
तेलंगवाडी ता.कंधार येथील छोट्यासा गावातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश मामा बास्टे हे अनेक वर्षांपासून तेलंगवाडी , उस्माननगर परिसरातील अनेक सामाजिक , शैक्षणिक कार्यक्रमात स्वत : हून सहभागी होत असतात. मागील अनेक वर्षांपासून ग्रामीण भागात भाजपाचे काम करतात. पक्षाच्या अनेक सभा व बैठकीला उपस्थित राहून पक्ष वाढविण्याचे काम करतात. त्यांची असणारी जिद्द , व तळमळ पाहून पक्षाने त्यांच्यावर भाजपा तालुकाउपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.
त्यांना विद्यार्थी दशेपासूनच राजकारणाची आवड आहे. त्यांचे राजकारण नेहमी सामाजिक बांधिलकेला धरून असून ,ते कोणत्याही पदाची अपेक्षा न करता , नि: स्वार्थी भावनेने कार्य करीत असतात. तेलंगवाडी ,उस्माननगर , शिराढोण परिसरातील प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांचा सहभाग व निर्णय महत्त्वाचा मानल्या जातो . त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन पक्ष श्रेष्ठीने कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार प्रविण पाटील चिखलीकर व भारतीय जनता पार्टी कंधार चे तालुका अध्यक्ष प्रा.किशनराव डफडे यांनी त्यांची भाजपा तालुका उपाध्यक्ष म्हणून निवड केल्याचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे.पुढील काळात पक्षासाठी जोमाने काम करून पक्षाची विचारधारा ग्रामीण भागात रुजविण्यासाठी काम करण्याची आशा वरिष्ठांनी त्यांच्या कडून व्यक्त केली.
भारतीय जनता पक्षाच्या तालुका उपाध्यक्ष पदी सुरेश मामा बास्टे यांची निवड झाल्याबद्दल. माजी सरपंच तुकाराम वारकड गुरुजी ( भाजपा राष्ट्रीय सदस्य , व माजी चेअरमन ) ,माजी सरपंच वैजनाथ पाटील घोरबांड , माधवराव भिसे , चेअरमन संजय वारकड ,( ग्रा.पं.सदस्य ) आमिन आदमनकर ( माजी सरपंच ) बालाजी पु.घोरबांड , बाबुराव पाटील घोरबांड , देवराव डांगे ,रतन आदमनकर , शिवशंकर काळे ( ग्रा.पं.सदस्य ) रामदास तांबोळी , बालाजीराव आडबे , माधवराव वारकड , बाबुराव पोकले , रंगनाथ सुक्रे , व्यंकटराव सुक्रे , शंकरराव दासरे ,डिगांबर पोकले , गोविंद बास्टे ,केशव आडबे , यांच्यासहित मित्र मंडळसह अनेकांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या.