क्राईमनांदेड

हिमायतनगर येथे पान शॉप दुकानांवर कारवाई करून 10 हजार 96 रुपये किंमतीचा गुटखा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विभागाची कारवाई

नांदेड। अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने 28 नोव्हेंबर रोजी हिमायतनगर शहरातील विविध पान शॉप दुकानाची तपासणी करण्यात आली. या तपासणीत एकुण 5 पान शॉप दुकानातून गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू इत्यादी 10 हजार 96 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. दरम्यान हिमायतनगर शहरात गुटक्याचा होलसेल धंदा करणारे बडे मासे सोडून छोट्या पान टपरी वाल्यांवर कार्यवाही झाल्याने सर्वसामान्य जनतेत अन्न औषध प्रशासन विभागाच्या वतीने केलेल्या कार्यवाही बाबत नाराजी व्यक्त केली जाते आहे.

हिमायतनगर येथील प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्रेते शुभम रामु नरवाडे, पवन चंद्रकांत ढोणे वय 23 वर्षे, प्रताप गल्ली, हिमायतनगर, रामदास नारायण रच्चेवार, वय 54 वर्षे, कलीका गल्ली, हिमायतनगर, तानाजी शिवाजीराव ढोणे वय 33 वर्षे, प्रताप गल्ली, हिमायतनगर , पुरवठादार बाबुराव शिंदे, हिमायतनगर व शेरु, चौपाटी, हिमायतनगर मे. इम्रान पान शॉप, परमेश्वर मंदीर समोर, हिमायतनगर जि. नांदेड चा मालक इम्रान यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन हिमायतनगर येथे अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 26 (1), 26 (2) (iv), 27 (3) (d), 27 (3) (e) व 30 (2)(अ) चा भंग करुन शिक्षापात्र कलम 59 अन्वये तसेच भा.द.वि.चे कलम 34,188,272,273,328 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिमायतनगर येथील मे. इम्रान पान शॉप, परमेश्वर मंदिर समोरील दुकानाचा मालक व विक्रेता इम्रान याने प्रतिबंधित अन्न पदार्थ प्रकरणी कायदेशिर कारवाई करीत असताना शासकीय कामात अडथळा केला म्हणून त्यांचे विरुध्द कलम 353 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नांदेड कार्यालयातील सहायक आयुक्त सं.ना.चट्टे, सहायक आयुक्त रा.मा. भरकडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी आर.पी. पाटील, सं.वि.कनकावाड, स.सु.हाके, ऋ,र. मरेवार व अ.भ.भिसे यांच्या पथकाद्वारे घेण्यात आली आहे असे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त रा. मा. भरकड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!