मराठा आंदोलनाला यश, सिडको परिसरात जल्लोष, फटाक्यांची आतिषबाजी…

नवीन नांदेड| २७ जानेवारी रोजी मराठा आंदोलनाचा सर्व मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा योध्दा जरांगे पाटील यांच्यी मुंबई आंदोलन दरम्यान भेट घेऊन लेखी अश्वासन देऊन मागण्या मान्य केल्या नंतर राज्यभर आनंदोत्सव साजरा करण्यात आला, सकाळी १० वाजता सिडको येथे ढोल ताशा गजर, फटक्यांची आतिषबाजी, गुलाल ऊघळुन ,व पेढे देऊन आनंदोत्सव साजरा करत सिडको ते जिजाऊ सृष्टी, हडको दरम्यान ढोल ताशा व समाजबांधव यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढून जल्लोष व्यक्त केला.
२७ जानेवारी रोजी सकाळी सिडको परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मराठा आंदोलनाचा सर्व मागण्या मान्य झाल्याबद्दल सिडको परिसरात वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष सतिश बसवदे, नांदेड शहर महिला अध्यक्ष डॉ. ललिता शिंदे, युवा नेते उदय भाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाक्यांच्या आतिषबाजी व पेढे वाटुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विजय असो, एक मराठा लाख मराठा,मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील अगो बढो तुम्हारे साथ हैं, जय भवानी जय शिवाजी यावेळी घोषणा देण्यात आल्या.
हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास संजय पाटील घोगरे व समाज बांधवांनी पुषप हार अर्पण केला.यावेळी माजी नगरसेवक प्रा. अशोक मोरे,अन्नाराव हंबर्डे, पत्रकार रमेश ठाकूर अमोल जाधव, माधव देवसरकर,आनंदराव गायकवाड,संदीप कदम,अवधुत पवार, डॉ.शिवणकर,विठ्ठल किरकण, एस.पी.कुंभारे, देविदास कदम,तरटे, अशोक मेटकर,बालाजी मगर, संभाजी पतलावे,शिवराज देशमुख,पिंटु देशमुख,सचिन ढेबंरे, मनोज चौदते,प्रितम लिबेंकर ,महेश शिंदे,अनिस घोगरे,गोविंद शिरसे,गणेश सावंत,ऊतम कुरे,शंकर धिरडीकर, विठ्ठल जाधव, लक्ष्मणराव कल्याणकर, शिवम कदम, व्यंकट जाधव, शेषराव लोढे, चक्रधर किवळेकर, गजानन मोरे,कृष्णा चाभरेकर, व्यंकटेश पवार,यांच्या सह पार्वती कोरडे, सुलोचना बेळीकर,सारीका व्यवहारे,संगिता कदम, संगीता मोरे,यांचा सह समाज बांधव , सर्व पक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
