करियरनांदेड

पंतप्रधानांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ मार्गदर्शनाचा वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

नवीन नांदेड| भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘परीक्षा पे चर्चा’ या विषयावर देशभरातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन केले. नांदेडच्या वसरणी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या सभागृहात दूरदृश्य प्रणाली द्वारे एलसीडी प्रोजेक्टरवर या मार्गदर्शनाच्या अभूतपूर्व मेजवानीचा लाभ घेतला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शेखर घुंगरवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना पार्श्वभूमी विशद केली. महाविद्यालयातील कनिष्ठ आणि वरिष्ठ विभागाच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा एकाग्रतेने लाभ घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षेच्या अनुषंगाने केलेले मार्गदर्शन विद्यार्थी शांतचित्ताने ऐकून घेताना दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षेच्या संदर्भाने त्यांचे स्वानुभव यावेळी विद्यार्थ्यांसमोर कथन केले. परीक्षा तणाव मुक्त होऊन या प्रक्रियेला कसे सामोरे गेले पाहिजे याविषयी त्यांनी मार्गदर्शक सूचना केल्या,वसंतराव नाईक महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी यासंबंधी आपल्याला या मार्गदर्शनाचा भविष्यात निश्चितच लाभ होईल, असे मत बोलून दाखवले.

यावेळी उप प्राचार्यडॉ.व्ही.आर.राठोड, प्रा.एन.पी.दिंडे,डॉ.जगदिशदेशमुख,डॉ.एस.व्ही शेटे,डॉ.आर.एम. कांगणे, डॉ. यु.एस. कानवटे, डॉ.एस.बी.गरुड, डॉ. साहेबराव मोरे,डॉ.गणेश लिंगमपल्ले,डॉ.विजय मोरे, डॉ.साहेबराव शिंदे,कार्यालयीन अधीक्षक आर.डी. राठोड, प्रा.कोतवाल, प्रा.देवकते, प्रा. मुस्तापुरे,प्रा.शेख, प्रा.झांबरे, प्रा. सुधळकर ,प्रा.जायदे यांच्यासह वसंतराव नाईक महाविद्यालयातील वरिष्ठ तसेच कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!