करियरनांदेड

महिलांसाठी शनिवार 17 फेब्रवारी रोजी विशेष रोजगार मेळावा; बेरोजगार महिला उमेदवारांनी सहभाग नोंदवावा

नांदेड| जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड कार्यालयाच्यावतीने नांदेड जिल्हयातील बेरोजगार महिला उमेदवारांसाठी शनिवार 17 फेब्रुवारी 2024 रोजी विशेष पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार महिला उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी याकरीता नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सकाळी 10 वा. रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये नांदेड जिल्हयातील बेरोजगार महिला उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती रेणूका तम्मलवार यांनी केले आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील विविध नामांकित कंपन्यांनी आपली रिक्तपदे अधिसूचीत केली आहेत. नांदेड जिल्हयातील ज्या काही इतर आस्थापनांना रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवायचा आहे अशा आस्थापनांनी या विभागाच्या www.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर आपली रिक्तपदे अधीसूचीत करावीत. याबाबत काही अडचण आल्यास 8830807312 या क्रमांकावर संपर्क साधावा.

महास्वयम पोर्टलवर या कंपन्यांनी आपली रिक्त पदे अधिसूचीत केली
मधुरा मायक्रो फायनान्स लि. नांदेड या कंपनीत ट्रेनी केंद्र मॅनेजरच्या एकुण 10 पदासाठी बारावी / पदवी शिक्षण आवश्यक आहे. या पदासाठी वेतन 8 हजार रूपये असेल तर नोकरीचे ठिकाण नांदेड राहील. परम स्किल छत्रपती संभाजीनगर कंपनीत ट्रेनीच्या एकुण 150 पदासाठी दहावी/बारावी/आटीआय/पदवी उत्तीर्ण असावे लागेल. या पदासाठी 17 हजार रूपये वेतन असून नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर राहील.

धृत ट्रान्समीशन छत्रपती संभाजीनगर येथील कंपनीत ट्रेनी ऑपरेटरच्या 500 पदासाठी दहावी/बारावी/आटीआय/पदवी शिक्षण आवश्यक आहे. या पदासाठी वेतन 12 हजार 500 रूपये असून नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर असेल. एल.आय.सी.ऑफ र्इंडिया नांदेड येथे इन्शुरन्स अॅडव्हायझरच्या 83 पदे असून दहावी/बारावी/पदवी उत्तीर्ण आवश्यक आहे. या पदासाठी 15 हजार रूपये वेतन असून नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी नोकरीचे ठिकाण राहील.

श्री जगदंबा सेंद्रीय कृषी सेवा केंद्र हदगाव येथे सेल्स एक्सुकेटिव्ह पदाच्या 15 जागेसाठी पदवी व संगणक शिक्षण आवश्यक आहे. या पदासाठी 7 हजार रूपये वेतन दिले जाईल. हदगाव येथे नोकरीचे ठिकाण असेल. कैलास फर्टिलायझर नांदेड येथे डाटा ऑपरेटरच्या 20 पदासाठी दहावी/बारावी/पदवी/संगणक शिक्षण आवश्यक आहे. या पदासाठी 8 हजार रूपये वेतन असून नोकरीचे ठिकाण नांदेड असेल.

नवकिसान बायोप्लॅनटेक नांदेड कंपनीत फ्रंट ऑफिस एक्सुकेटिव्ह एका पदासाठी दहावी/बारावी/पदवी शिक्षण आवश्यक आहे. या पदासाठी 10 हजार रूपये वेतन असून नोकरीचे ठिकाण नांदेड असेल. तिरूमला इंडस्ट्रीयल ॲन्ड अलायड सर्व्हिसेस लि. पुणे या कंपनीत ट्रेनी/ज्युनीयर मॅनेजमेंटच्या 100 पदांसाठी बारावी/पदवी शिक्षण आवश्यक आहे. वेतन 10 हजार रूपये असून पुणे, शिरूर, रांजणगाव येथे नोकरीचे ठिकाण असेल.

ज्युट्रीविडा न्युट्रॉस्युटिकल प्रा. लि. संभाजीनगर या कंपनीत मेडिकल रिप्रेजेंटेटिव्ह या पदासाठी 2 जागा असून शिक्षण पदवी आवश्यक आहे. वेतन 15 हजार रूपये दिले जाईल. या पदासाठी नोकरीचे ठिकाण नांदेड, छत्रपती संभाजीनगर असेल. सालासार सेल्स कॉर्पोरेशन नांदेड कंपनीत कॉम्प्युटर ऑपरेटरच्या 30 पदासाठी दहावी/बारावी/पदवी/पदविका शिक्षण आवश्यक आहे. या पदासाठी 9 हजार रूपये वेतन आहे. नोकरीचे ठिकाण नांदेड राहील.

क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लि. पुणे कंपनीत ट्रेनी केंद्र मॅनेजरच्या 100 पदासाठी बारावी/पदवी/पदविका शिक्षण आवश्यक आहे. या पदासाठी 8 हजार रूपये वेतन दिले जाईल. नोकरीचे ठिकाण नांदेड राहील. संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी येथे शिक्षिका 3 तर अधिक्षिका 1 पदासाठी बीए/बीएड/एमए/एमएससी शिक्षण आवश्यक आहे. या पदासाठी 15 हजार रुपये वेतन असेल. नोकरीचे ठिकाण सगरोळी, नांदेड राहील.

एसबीआय लाइफ इन्शुरन्स कॉ.लि. नांदेड येथे ॲडव्हायजर असेट अलोक्टेड मॅनेजरच्या 50 + 20 जागा असून दहावी/बारावी/पदवी/पदविका शिक्षण आवश्यक आहे. या पदासाठी 8 हजार रूपये वेतन दिले जाईल. नोकरीचे ठिकाण नांदेड असेल. CAIT Edusys pvt ltd pune येथे अप्रेंटिस ट्रेनीच्या 150 पदासाठी दहावी/बारावी/आयटीआय शिक्षण आवश्यक आहे. या पदासाठी 14 हजार 500 रुपये वेतन असेल. नोकरीचे ठिकाण पुणे राहील. डोमिनोज पिज्जा नांदेड येथे ऑपरेटरच्या 5 पदांसाठी दहावी/बारावी/पदवी शिक्षण आवश्यक आहे. या पदासाठी 10 हजार रूपये वेतन दिले जाईल. नोकरीचे ठिकाण नांदेड असेल.

भारत फायनान्शियल इन्क्लुजन लि. नांदेड येथे फिल्ड ऑफीसरच्या 50 पदासाठी दहावी/बारावी/पदवी शिक्षण आवश्यक आहे. या पदासाठी 14 हजार 250 वेतन असेल. नोकरीचे ठिकाण नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली असेल.
ज्र्युक्लीयस टेक्नॉलॉजी नांदेड येथे मार्केटिंग एक्सुकेटिव्हच्या 20 पदासाठी दहावी/बारावी/पदवी शिक्षण आवश्यक आहे. या पदासाठी 10 हजार रूपये वेतन असेल तर नोकरीचे ठिकाण नांदेड राहील, असे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!