
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील पात्रताधारक अनाथ मुलांना आधार कार्ड, रेशनकार्ड, जातीचा दाखला, अधिवास व राष्ट्रीयत्वाचा दाखला व मतदान ओळखपत्र आदी उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय व महसूल विभागाच्या समन्वयातून अनाथ बालकांसाठी 23 फेब्रुवारी ते 5 मार्च 2024 या कालावधीमध्ये पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे.
शासनाच्या निर्देशानुसार 23 फेब्रुवारी ते 5 मार्च 2024 या कालावधीमध्ये अनाथ मुलांना आधार कार्ड, रेशनकार्ड, जातीचा दाखला, अधिवास व राष्ट्रीयत्वाचा दाखला व मतदान ओळखपत्र इत्यादी उपलब्ध करुन देण्याबाबत संपूर्ण राज्यात पंधरवडा राबविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात देखील हा पंधरवडा यशस्वीपणे राबविण्यात येणार आहे. यासाठी महसूल विभागाच्या समन्वयातून हे प्रमाणपत्र अनाथ मुलांना शासन आपल्या दारी या संकल्पनेच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
या पंधरवड्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या जिल्हास्तरावर समर्पित कक्षासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर.आर. कांगणे यांचा मो. क्र. 9421382042 तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती विद्या आळणे यांचा मो.क्र. 9730336418, 9830049738 यांच्याशी संपर्क साधावा. अनाथ बालकांना व त्यांच्या नातेवाईकांनी प्रमाणपत्राबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने या समर्पित कक्षास 23 फेब्रुवारी ते 5 मार्च 2024 या कालावधीत भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आर.आर. कांगणे यांनी केले आहे.
शासकीय आणि खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना बीएच मालिकेत नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याची सुविधा
केंद्र शासनाने 26 ऑगस्ट 2021 अधिसूचना अन्वये खाजगी क्षेत्रात काम तसेच शासकीय कार्यालयात, विभागामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना बीएच मालिकेमध्ये नोंदणी क्रमांक मिळण्याविषयी अर्ज करण्यासाठी तसेच त्यामध्ये अशा वाहनांवर आकारण्यात येणाऱ्या कराविषयी तरतुद केली आहे. ही अधिसूचना 15.09.2021 पासून अंमलात आली आहे. बीएच मालिकेतील नोंदणी चिन्हासाठी खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या अर्जदारास नमूना 60 मध्ये काम करत असल्याबाबतचे प्रमाणपत्र (Working Certificates) व शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अर्जदारास कार्यालयीन ओळखपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. अर्जदारास नियम 48 मध्ये नवीन परंतुकानुसार बीएच मालिकेतील नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करणे अर्जदारास ऐच्छिक असणार आहे.
खाजगी संस्थेतील तथा शासकीय सेवेतील वाहनधारक यांचे संस्थेची, शासकीय कार्यालयाची भारतातील विविध राज्यात कार्यालय आहेत. तसेच अशा वाहन धारकांकडून सादर करण्यात आलेल्या वास्तव्याचा दाखला व वेतन देयके याबाबत व सदर वाहन धारक सद्यस्थितीत ज्या विभागात, कंपनीत कार्यरत आहे, त्याच विभागात, कंपनीमध्ये तो यापूर्वी इतर राज्यात कार्यरत होता का ? ही बाब तपासल्यानंतर त्यांचे वाहन बीएच नोंदणीसाठी ग्राहय धरण्यात येतील.
बीएच सिरिजचा लाभ प्रति व्यक्ती फक्त एक वाहनासाठीच देण्यात येईल. 25 लाख किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीची चारचाकी वाहने तसेच 2 लाख किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीची दुचाकी वाहने बीएच सिरीज नोंदणीसाठी वाहन धारकाचे आयटी रिर्टन किंवा बँक खात्याचे विवरणपत्र सादर करण्यात यावे. भारतीय सुरक्षा दलातील वाहनधारकांच्या वाहनांचे बीएच सीरिजमध्ये नोंदणी करतांना त्यांनी फक्त सुरक्षा दलाचे ओळखपत्र सादर करावे. खाजगी किंवा शासकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अर्जदारांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
