श्रीक्षेत्र राहेर येथे एक जानेवारीपासून हभप सुनील महाराज आष्टीकर यांची श्रीराम कथा…….
नायगाव, रामप्रसाद चन्नावार| नायगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र राहेर येथे श्रीलक्ष्मी नरसिंह भगवान, श्री चक्रधर स्वामी, श्री संत बाळगीर महाराज यांच्या कृपाआशीर्वादाने व श्री हनुमंत राय व लक्ष्मी माता मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहासह रामायणाचार्य ह भ प सुनील महाराज आष्टीकर यांची श्रीराम कथा दिनांक 1 जानेवारी 2024 पासून सुरुवात होणार आहे. दरम्यान पहाटे चार ते सहा काकडा आरती, सकाळी सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी दहा ते बारा तुकाराम गाथा भजन, दुपारी बारा ते तीन श्रीराम कथा, सायंकाळी चार ते सहा महाप्रसाद, सायंकाळी सहा ते सात हरिपाठ, रात्री नऊ ते 11 हरिकीर्तन व त्यानंतर हरीजागर असे धार्मिक कार्यक्रम दररोज होणार आहेत.
अखंड हरिनाम सप्ताहाचे हे सोळावे वर्ष असून श्रीक्षेत्र राहेर येथील समस्त गावकरी मंडळीच्या वतीने हा धार्मिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आतापासूनच मोठे प्रमाणात परिश्रम घेतले जात आहेत. किर्तन महोत्सवात दिनांक 1 जानेवारी 2024 ह भ प संतोष महाराज वनवे, दिनांक 2 जानेवारी हभप संग्राम बापू भंडारे महाराज, दिनांक 3 जानेवारी हभप महंत समाधान महाराज भोजेकर, दिनांक 4 जानेवारी हभप कु. ज्योतीताई धनाडे, दिनांक 5 जानेवारी ह भ प गंगाधर महाराज एकलारकर, दिनांक 6 जानेवारी हभप कु. रितूताई बेळकोणीकर, दिनांक 7 जानेवारी ह भ प कु. कांचनताई शेळके, दिनांक आठ जानेवारी हभप संजय महाराज हिवराळे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी काल्याचे किर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री राम कथा प्रवक्ते रामायणाचार्य ह भ प सुनील महाराज आष्टीकर यांना संगीत साथ देण्यासाठी तबला वादक श्रीनिवास कुलकर्णी संभाजीनगर, शिंध व गायक ज्ञानेश्वर महाराज माळी नांदेड, हार्मोनियम व गायक सूर्यकांत महाराज बिंनीवाले पुणे, पॅड वादक श्री खंडेराव महाराज करवर गंगाखेड, झाकी दर्शन भरत महाराज उपाध्ये परभणी हे साथ देणार आहेत. अखंड हरिनाम सप्ताह व दिव्य श्रीराम कथा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, किर्तन महोत्सवासह धार्मिक कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीक्षेत्र राहेर येथील समस्त गावकरी मंडळी, तरुण युवक मंडळीकडून करण्यात आले आहे.