श्रीक्षेञ माहुर, कार्तिक बेहरे| माहुर तालुक्यातील मौजे केरोळी येथील वाळुडेपो निविदा रद्द करणेबाबत माहूर तहसीलदार किशोर यादव यांनी दि.९ जुलै २०२४ रोजी शासनाकडे हवाल पाठविला आहे. शिवसेना (शिंदे)गटाच्या पदाधिकार्यांनी केलेल्या आमरण उपोषणानंतर हा अहवाल पाठविण्यात आला आहे.परंतु ठेकेदार महंमद सलीम अन्सारी रा.यवतमाळ यांनी नियमबाह्य कामे तसेच घरकुल लाभार्थ्यांची आर्थिक फसवून केल्याने याच अहवालानुसार त्यांचेवर फौजदारी व दिवाणी गुन्हे दाखल करावे अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे संघटक विनोद पाटील सुर्यवंशी व सोशल मिडिया प्रमुख सदानंद पुरी यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
उल्लेखनीय बाब अशी की, या प्रकरणात नायब तहसीलदार तथा तपासणी पथक प्रमुख डाॅ.राजकुमार राठोड यांनी दि.२४ जून २०२४ रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांना अहवाल देवून रेती तस्करांना क्लिनचीट दिल्याने,आसा खोटा अहवाल पाठलविणाऱ्या नायब तहसीलदारावर निलंबनाची टांगती तलवार लटकत आहे.
तहसीलदार माहुर यांनी दि.९ जुलै २०२४ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्राप्रमाणे वाळु ठेकेदारावर ६ आरोप सिद्ध झाले आहेत,असे असतांना नायब तहसीलदार तथा रेती तपासणी पथक प्रमुख डाॅ.राजकुमार राठोड यांनी ठेकेदार व रेती दलालाच्या बचावासाठी दि.२४ जून रोजी केरोळी रेती डेपोवर जावून आपल्या मर्जीतील लोकांच्या साक्षर्या घेवून पंचनामा करत प्रशासनासमोर खोटा अहवाल सादर करत रेती ठेकेदार महंमद असिफ अन्सारी यांना क्लीनचिट देण्याचा निंदनीय प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
तेव्हा रेती दलाल व ठेकेदारासह खोटे पंचनामे व अहवाल सादर करणाऱ्या सर्वच महसूल कर्मचाऱ्यावर फसवणूक, दिशाभूल, चोरी,भेसळ, बनावट दस्तऐवज असे माहुर तहसीलदार किशोर यादव यांनी सिध्द केलेल्या आरोपावरून प्रचलित कायद्याच्या कलमानूसार स्थानिक संघटीत रेती माफिया विरोधात गुन्हे दाखल करुन नव्याने घरकुल लाभधारकांना बांधकाम योग्य वाळु उपलब्ध करून द्यावे,अशा आशयाचे लेखी निवेदन देवून सत्ताधारी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांने मागणी केली असुन त्याच्या प्रति मा. मुख्यमंत्र्यापासुन माहुर पोलिसांपर्यंत दिल्या आहेत.