
हदगाव, शे.चांदपाशा| शिंदे गट शिवसेना जिल्हा प्रमुख नांदेड या पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र बाबुराव कदम कोहळीकर यांनी शिवसेना सचीव बाळासाहेब भवन मुंबइचे संजयजी मोरे यांच्याकडे पाठविला आहे. जो पर्यंत मराठा समाजाला ओ.बी.सी. आरक्षन मीळत नाही तो पर्यंत मी हे पद स्वीकारणार नाही असे त्या पात्रात म्हंटले आहे.
एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना दुसरीकडे मराठा समाजातील अनेक नेते आपल्या पदाचा राजीनामा देऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर करत आहेत. त्याचा पार्श्वभूमीवर मनोज जरंगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा देता आता शिंदे गट शिवसेना जिल्हा प्रमुख ब्बुराव कदम कोहळीकर यांनी देखील शिवसेना नांदेड जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे.
जो पर्यंत मराठा समाजाला ओ.बी.सी. आरक्षन मीळत नाही तो पर्यंत मी हे पद स्वीकारणार नाही. तसेच मनोज जंरागे पाटलांचे जे अमरण उपोषन चालु आहे व संबंध महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे साकळी उपोषण चालु आहे त्यांच्या सोबत असून, आरक्षणाच्या मागणीला माझा पाठीबां आहे असे पात्रात नमूद करण्यात आले आहे.
