उस्माननगर। येथून जवळच असलेल्या मौजे शिराढोण ता. कंधार येथील भुमिपुत्र आनंद शंकरराव शिंदे याची शेतीविषयक जमीन व जल संसाधन अभियांत्रिकी विभागात कृषी अभियांत्रिकी या विषयात उच्च शिक्षण घेण्यासाठी GATE 2024 या प्रवेश परीक्षेतून भारतातून 63 व्या क्रमांकाने देशातील सर्वोच्च शिक्षण संस्था“आय. आय. टी. (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) मध्ये निवड झाली. लाखो विद्यार्थी या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी परिक्षा देत असतात. अशा परिक्षेत आनंद शिंदे ने भारतातून 63क्रमांकाने उत्तीर्ण होत यश संपादन केले.
आनंदा शिंदेचे प्राथमिक शिक्षण शिराढोण मधील जिल्हा परिषद मध्ये झाले तर माध्यमिक शिक्षण भीमाशंकर विद्यालय शिराढोण येथे झाले नंतरचे पदवीचे शिक्षण परभणी कृषी महाविद्यालयात पूर्ण झाले.आनंद शिंदे यांनी मिळवलेले यश अगदी आकाशाला ही भुरळ पडणार कारण घरातील परिस्थिती अगदी हळवी वडील ट्राफिक हवालदार तर आई मोलमजुरी करून घराचा गाडा हाकणारी अश्या परिस्थिती आपला मुलगा शिकून आय आय टी साठी पात्र करणं हे मात्र आनंद च आनंदी यश नक्की.
आनंद शिंदे यांनी मिळवलेलं यश म्हणजे प्रेरणा देणार असाधारण आणि अनन्यसाधारण यशाची व्याख्या काय असते हे तू सिद्ध करून दाखवलस.तुझ्या विलक्षण बुद्धिमतेचे आणि ती साक्षात सिद्ध करण्याचा तुझ्या प्रतिभेचे हार्दिक आत्मीय कौतुक आणि भविष्यातील ऐश्वर्य संपन्न जीवनासाठी शुभेच्छा प्रिय आनंद डॉ. गोविंद नांदेडे, पूर्व शिक्षण संचालक महा.राज्य.
शिंदे कुटुंबियांना आम्ही खूप दिवसापासून पाहतो ओळखतो अगदी हलाखीचे जीवन जगून मुलांना उच्च शिक्षण दिल आनंद ने यश मिळवलं त्या यशा बद्दल आपल्या शाळेची बरोबरच गावाची मान गर्वाने उंचावली, खुशालराव पांडागळे, सरपंच तथा प्राचार्य भीमाशंकर विद्यालय.
आनंद शिंदे यांची ही एक विलक्षण कामगिरी आहे.GATE ची पात्रता म्हणजे IIT मध्ये प्रवेश, भारतातील सर्वोच्च शिक्षण संस्थांपैकी एक आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो आणि भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा देतो.मी त्याच्या अभिमानी पालकांचेही अभिनंदन करतो. त्याच्या शिक्षकांचे आणि मार्गदर्शकांचेही अभिनंदन. आम्हा सर्व शिराढोणकरांना तुमचा अभिमान आहे. डॉ. बालाजी नांदेडे. UPSC डायरेक्टर आंध्र. प्रदेश.