नांदेड। नांदेड जिल्ह्यातील भुमिपूत्र व सध्या परभणी जिल्ह्यातील गंगाखेड पोलीस स्टेशन येथे कार्यरत वरीष्ठ पोलीस अधिकारी दिपक कुमार वाघमारे यांना सेवा काळात केलेल्या उल्लेख निय कार्याची दखल घेऊन पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सन्मान चिन्ह पदक यांना जाहीर झाले असून १ मे रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत परभणी येथील स्टेडियम वर आयोजित एका सोहळ्यात देण्यात येणार आहे.
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील उम्रज या गावाचे रहिवासी असून पोलिस दलात कर्तव्यकठोर अशी व पोलिस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांची प्रतिमा आहे. सरळ सेवा भरती १९९५ च्या बॅचचे असून पोलीस उपनिरीक्षक पदी रुजू झाले होते.
वरीष्ठ पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे हे सध्या परभणी जिल्ह्यातील गंगाखेड पोलीस ठाणे येथे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
गेली २९ वर्षाचे महाराष्ट्र पोलीस सेवेत अनेक संवेदनशिल गुन्हयाची उकल,तपास,दोषसिध्दी केलेली आहे.विशेष सुरक्षा विभाग नांदेड,नांदेड जिल्हा पोलीस, गडचिरोली हिंगोली पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे तत्कालीन प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे हे कर्तव्यावर असतांना माला विरुद्धचे एकुण १७ गुन्हे उघडकीस आणून एकुण १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन उल्लेखनीय कामगिरी केली होती.
विविध मथळयाखाली एकुण ४६८ प्रतिबंधक कार्यवाही केल्या यात प्रामुख्याने गुन्हेगारांचे टोळीला एक वर्षाकरीता स्थानबद्ध करण्यात आले होते.
तसेच मुंबई दारुबंदी कायदा अन्वये एकुण १५७ प्रकरणे दाखल केली होती.मोटार वाहन कायदयाअंतर्गत एकुण ३०१५ केसेस दाखल करुन तडजोड शुल्क म्हणून २२,६०,४००/- रु आकारुन उत्कृष्ट कामगिरी केली आहे. संवेदनशील समजल्या जाणाऱ्या उदगीर शहरात तसेच तालूक्यात सर्व सण उत्सव, ग्रामपंचायत निवडणूक ह्या शांततेत पार पाडून कुठलाही अनुचित प्रकार घडू दिला नाही.बकरी ईद, नवरात्र महोत्सव, शिवजयंती महोत्सव, ईद-ए-मिलाद, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, होळी/ रंगपंचमी असे सण उत्सव शांततेत पार पाडुन कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिला नाही.
मालेगाव शहरातील आझादनगर पोलीस ठाणे येथील आर्थिक फसवणुकीच्या घडलेल्या चार गुन्ह्यात उल्लेखनीय तपास करून एकुण ३६ कोटी ९० लाख रूपयाची रिकव्हरी केली होती तर
येवला पोलीस ठाणे येथे तत्कालीन प्रभारी अधिकारी म्हणून कर्तव्यावर असतांना प्रसिध्द कांदा व्यापाऱ्याच्या पुतण्याचे व त्याचे मित्राचे ३० लाख रूपये खंडणी साठी अज्ञात आरोपीतांनी अपहरण केले होते. या गुन्हयात आहे. विशेष सुरक्षा विभाग नांदेड, नांदेड जिल्हा पोलीस, गडचिरोली, हिंगोली, नाशिक ग्रामीण पोलीस दल, अहमदनगर, लातूर मध्ये अतिउत्कृष्टरित्या सेवा बजावली आहे. या दरम्यान विविध पदांवर केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना आज पावेतो ३० प्रशंसापत्रे, २४४ बक्षीसे देवून सन्मानित करण्यात आले आहे.
दि. २५ एप्रिल २०२४ रोजी प्रशंसनीय व उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस विभागातील सर्वोच्च पुरस्कार असलेले पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह जाहीर झाला असून दि.१ मे २०२४ रोजी त्यांना पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल पोलीस उपविभागीय अधिकारी, ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.