ज्येष्ठ नागरिक शिबिरार्थींना आयुष्यमान भारत कार्ड विना मुल्य मिळणार..!-डॉ.हंसराज वैद्य
नांदेड| येत्या 5 नोव्हेबर, महिण्याच्या पहिल्या रविवारीच्या नियमित बैठकीनंतर लगेचच आयोजित खास ज्येष्ठांसाठींच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीरात मुख्यत्वे करून सेवानिवृत्त व ज्येष्ठांच्या वयानुरूप संधीवात, कमजोरी, मान, पाठ, कंबर दुखी, हात पाप दुखणें, पिंडऱ्या (पोटऱ्या) ओढणें, हाडे दुखणें, मुत खडा, दमा(आलर्जी) इ.चे निदान व उपचार विनामुल्य करण्यात येणार आहेत. हे शिबिर सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ, वजिराबाद ज्येष्ठ नागरिक संघ,नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती आणि गुफिक हेल्थ केयर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर वैद्य रूग्णालय परिसर वजिराबाद चौक येथे दि.5/11/23 रोजी रविवारी सकाळी 11 ते दूपारी 2 वाजे पर्यंत असणार आहे.
या शिबिराचे उद्घाटन समाज कल्याण सह आयुक्त शिवानंदजी मिनगीरे यांच्या शुभ हस्ते तर बापू दासरी यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबीराची सुरूवात होणार आहे. तसेच सुभाषजी बार्हाळे, सौ.निर्मलाआई बार्हाळे, अशोक तेरकर, कॅ.डॉ.सौ.निर्मलाताई कोरे, सोमवाड यांची ही उपस्थिती लाभणार आहे. या शिबिरास शिवानंदजी मिनगीरे साहेब हे विशेष मार्गदर्शन करणार असून त्यांच्यावतीने व त्यांच्याच मार्फत आधार कार्ड धारक ज्येष्ठ नागरिक शिबीरार्थीना “आयुष्यमान भारतचे कार्ड” पण तयार करून विनामुल्य देण्यात येणार आहेत. सर्व ज्येष्ठ महिला पुरूषांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहान डॉ.हंसराज वैद्य, गारिषभाऊ बार्हाळे, भाताळे, प्रभाकर कुंटूरकर अदिनी केले आहे.