नांदेडमहाराष्ट्र

देव,देश,धर्म व गौरक्षनासाठी माँ जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना घडविले – विहींपचे गोविंद शेंडे यांचे प्रखर मत

किनवट/शिवणी,प्रकाश कार्लेवाड। किनवट तालुक्यातील शिवणी येथे काल दि.१३ ऑक्टोबर शुक्रवार रोजी विश्व हिंदू परिषद तर्फे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्ष पूर्ती निमित्ताने श्री छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेच्या समारोपन व विश्व हिंदू परिषदेच्या ६० वर्ष पूर्ती व स्व.गौरक्षक शेखर राप्पेली यांना आदरांजलीच्या निमित्ताने विश्व हिंदू परिषद तर्फे धर्म जागरण सभेचे आयोजन करण्यात आले होते.या धर्म सभेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री गोविंद शेंडे सभेला संबोधीत करतांना म्हणाले की,देव,देश,धर्म व गौ रक्षणासाठी मा जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना घडविले. परंतु अलीकडच्या काळात चुकीचा इतिहास या पिढीला शिकविला गेला. आता या पिढीला व येणाऱ्या पिढीला खरे इतिहास शिकवणे गरजेचे आहे असे प्रखर मत व्यक्त केले.

तर सुरेश महाराज यांनी देव ,देश,धर्मासाठी हिंदूंनी एकत्र येणे काळाची गरज असे मत व्यक्त केले.या वेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून शाम बापू भारती महाराज, गंगेश्वर महाराज मदानापूर, कैलास टेकडीचे संत लिंबाजी महाराज, रघुनाथ कराड महाराज,नरसिंग महाराज वाघमारे,पवार गुरू स्वामी,रेड्डी महाराज,किनवट माहूर तालुक्याचे आमदार भीमरावज केराम,भाजपा जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर,संतोष तिरमनवार, श्याम रायवार अनिरुद्ध केंद्रे,किरण बिच्छेवार, गोवर्धन मुंडे,किरण ठाकरे हिंदू धर्म विचारक आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रभू श्रीराम,छत्रपती शिवाजी महाराज,बजरंगबली हनुमान व स्व.गौरक्षक शेखर रापेल्ली यांना अभिवादन करण्यात आले.पुढे बोलतांना शेंडे म्हणाले की,इतिहास चुकीच्या पद्धतीने शिकविला गेला येथे काही लोकांनी अकबर ला महान दाखविले.हिंदू धर्माचे खच्चीकरण करण्यासाठी इतिहास मिटवले गेले,देश व धर्म रक्षणासाठी ज्या- ज्या शूरवीरांनी महापुरुषांनी संत महात्म्यांनी आपले बलिदान दिले त्यांचे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही.धर्म संस्कृतीवर घात होत आहे.हे थांबले पाहिजे,महिलांचा सन्मान झाला पाहिजे, काही लोक गाईला पोळी खाऊ घालत आहेत तर काही समाजकंटक गाईची पोळी खात आहेत, यातील अंतर हिंदूंनी समजले पाहिजे.या साठी आपल्या घरासमोरील गौमाता कसायांना देऊ नका अन्यथा निसर्ग कोपेल असे बोलत धर्मांतर, लव्ह जिहाद, थांबवण्यासाठी प्रत्येक स्त्री माँ जिजाऊ होणे काळाची गरज आहे.हिंदू एकत्रित नव्हते तर आमच्यावर हजारो वर्षं मोगलांनी राज्य केले.

पुन्हा ती परिस्थिती येऊ नये या साठी हिंदूंनी आपले देव,देश,धर्म, गौ रक्षणासाठी एकत्र येणे काळाची गरज आहे असे विहींपचे प्रांत प्रमुख गोविंद शेंडे यांनी प्रखर मत व्यक्त केले.१९ जून च्या मध्यरात्री कसायांनी गोरक्षकावर केलेल्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या स्व.गौरक्षक शेखर रापेल्ली यांच्या परिवारातील सदस्यांचे व त्या घटनेतील जखमींचे सन्मान सत्कार करण्यात आले.या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विहींप जिल्हा अध्यक्ष श्याम रायवार यांनी केले तर आभार विहींप प्रांत सदस्य अनिरुद्ध केंद्रे यांनी मानले.सूत्र संचलन सहमंत्री संतोष रायवार, आशिष कऊटकर यांनी केले.

या वेळी साहेबराव देशमुख, गौरक्षा प्रमुख किरण बिच्चेवार, सुशील जोशी, पंजाब हुलगुंडे, आशिष कोउटीकवार, जगदीश तावडे,विठ्ठलराव मच्छरलावार रामचंद्र दारमवार,जिल्हा प्रचारक केशव लांडगे, दिक्कतवार सर किनवट माजी नगर अध्यक्ष आनंद मच्छेवार,भाजपा किनवट तालुका अध्यक्ष बालाजी आलेवार, हिमायतनगर भाजपा अध्यक्ष गजानन चायल,भाजपा किनवट शहर अध्यक्ष संतोष चनमनवार, माजी.जि.प.सूर्यकांत आरंडकर,सरपंच लक्ष्मीबाई डूडूळे सुनील कन्नावार, श्रीमती कमलबाई देशमुख, सायना पाटील,दत्ता बेहरे, बालगंगाराम भुसिवाड, भोजराज देशमुख, विठ्ठल सिंगरवाड, गंगारेड्डी रक्कम, श्रीधर रेड्डी,गंगाय्या भुसिवाड, कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवणी येथील बजरंग दलाचे जिल्हा गौरक्षक महेश कोंडलवाड,सोपान पेंटेवाड,बाबू मुद्दलवाड, ज्ञानेश्वर कार्लेवाड,धनंजय तुप्तेवार, शिवाजी कोंडामोड, विशाल मेंढेवाड,मनीकंठा कोंडलवाड, बालाजी राऊलवाड,चंद्रकांत कार्लेवाड, संतोष दारपवाड,सह असंख्य स्वयंसेवक कार्यकर्ते गावकरी मंडळी यांनी परिश्रम घेतले तर पसायदान म्हणून धर्म सभेला विराम देण्यात आले.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!