नवीन नांदेड। शालेय विद्यार्थी यांना पोलीस कायदे विषयी व ईतर कामकाज माहिती व्हावी यासाठी सिडको परिसरातील कुसुमताई विघालय येथील शालेय विद्यार्थ्यांसाठी पोलीस रेझींग डे अंतर्गत पोलीस स्टेशन ग्रामीण येथे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांनी माहिती दिली.
४ जानेवारी रोजी पोलीस स्टेशन ग्रामीण येथे कुसुमताई विद्यालय सिडको येथील विद्यार्थिनींना पोस्टे ला बोलवून त्यांना पोलीस रेझिंग डे निमित्त पोस्टे कामकाज विषयीं माहिती दिली, तसेच त्यांना महिला सुरक्षा, सायबर क्राईम याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गढवे, महिला उपनिरीक्षक पिंपरखेडे, उपनिरीक्षक मठवाड यांच्या सह ठाण्यातील पोलीस अंमलदार व महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शस्त्र प्रदर्शन व माहिती दिली. सदर कार्यक्रमात 96 विद्यार्थी व 4 शिक्षक यांची उपस्थिती होती .