क्रीडा

राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट १४ आतील मुलं व मुली चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सातारा संघ विजेता

नाशिक। टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 4 थि सबज्युनिअर टेनिस क्रिकेट चॅम्पियनशीप स्पर्धा . नाशिक यथे उत्साहात संपन्न झाली त्यामध्ये प्रथम क्रमांक सातारा, दुतिय क्रमांक पालघर जिल्हा तृतीय क्रमांक पिपरी चिचवड तसेच मुलींमध्ये पहिला क्रमांक नाशिक, द्वितीय क्रमांक धारासिव,तृतीय क्रमांक मूबंई व आहमदनगर संघयांना मिळाल्याबद्दल त्यांचे राज्यातून सर्वत्र अभिनंदन होतआहे.

या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी, महाराष्ट्र वुमन डायरेक्टर धनश्री गिरी ,नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव विलास गायकवाड,महेश मिश्रा ,विलास गिरी, परभणी जिल्हा सांगली जिल्हा सचिव विजय बिराजदार कोल्हापूर जिल्हा सचिव राजेंद्र सर सातारा जिल्हा सचिव चंद्रकांत तोरणे, सोलापूर जिल्हा सचिव अजित शेख औरंगाबाद जिल्हा सचिव सय्यद सर अहमदनगर जिल्हा सचिव महाराष्ट्राचे खजिनदार घनश्याम सानप धाराशिव रिप्रेझेंटिव्ह इंद्रजीत वाले व जिल्हा सचिव, क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रशिक्षण इत्यादी उपस्थित होत, महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट सचिव मिनाक्षी गिरी यांनी खेळाडूंना टेनिस क्रिकेट खेळाची माहिती व नियम सांगितले.

4 राज्य स्तरीय टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप नाशिक मैदानावर येथे संपन्न झाली या स्पर्धेसाठी राज्यातून मुलांचे 24 संघ व मुलींचे सात संघानी सहभाग नोंदवला या स्पर्धेचा अंतिम सामना सातारा विरुद्ध पालघर जिल्हा यांच्या झाला . सातारा संघाने विजयश्री मिळवला तर पालघर संघाने चांगले प्रयत्न करून या अंतिम सामन्यात चांगली चुरस निर्माण करून उपविजेता ठरला.. तसेच पिंपरी चिंचवड संघाला तिसरा क्रमांक मिळाला व मुलींमध्ये पहिला क्रमांक नासिक , दुसरा क्रमांक धाराशिव तिसरा क्रमांक मुंबई यांनी मिळवला.

या स्पर्धेमध्ये सर्व उत्कृष्ट फलंदाज मॅन ऑफ द सिरीज मिळवल्याबद्दल व संघाच्या चांगल्या कामगिरीबद्दल महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मिनाक्षी गिरी, विलास गिरी ,स्वप्निल ठोंबरे ,महेश मिश्रा, नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड योगिता महाजन यांनी सर्व खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.तसेच ..सन्मानचिन्ह, गौरवपदक, मानाचा फेटा असे स्वरूप होते मान्यवरच्या पाहुण्यांच्या शुभहस्तेबक्षीस वितरण करण्यात आले पंच म्हणून. संदीप पाटील, धनश्री गिरी लखन देशमुख, श्रीपाद, अर्जुन , सोमनगवडा बिरादार, मोहित ओके, प्रीत केन सागर मोरे धनंजय लोखंडे,, सुनील मोरय यांनी काम बघितले.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!