सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी व खाजगी गुत्तेदार यांनी संगनमताने प्रस्तावित कामे केलेली हाणून पाडणार, सरपंच दत्ता जाधव
नांदेड l नांदेड तालुक्यातील मौ वांगी येथे पुनर्वसन अंतर्गत मूलभूत सोयी सुविधेची कामे सरपंच तथा जिल्हाध्यक्ष पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे जिल्हाध्यक्ष दत्ता जाधव यांनी वेळो वेळी पाठपुरावा करून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्फत जिल्हा प्रशासनाला सूचना करून गावातील सर्व मूलभूत सोयी सुविधा यांचा अहवाल तयार केला व जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायत ला विश्वासात घेऊन सर्व सहकार्य करून घेऊन गावात जाय मोक्यावर जाऊन अहवाल करून सर्व गावकर्यांच्या उपस्थितीत पंचनामा केला व जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पुनर्वसन विभाग मंत्रालय मुंबई येथे अहवाल दाखल केला असून संगनमताने प्रास्तावित केलेल्या कामा बाबत ऊप जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात, वांगी येथील पुनर्वसन बाबत अहवाल महसूल मंत्री यांनी जिल्हाध्यक्षांची दखल घेऊन मंजुरी देण्यास शिफारस केली असता पुनर्वसन विभागाने सदरील अहवाल मंजूर करून प्रशासकीय मान्यता प्रदान केली ,गेली अनेक वर्षे रखडलेल्या कामांसाठी सरपंच यांनी जीवाचे रान करून पाठपुरावा केला असताना गावातील लोकांचे होणारे हाल होऊ नये या भावनेतून केलेल्या निर्मळ कामात आता मलिदा खाण्याच्या लगीनघाई ने खाजगी कंत्राटदार सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी यांना हाताशी धरून छुपा ठराव वापरू पाहत आहेत.
एवढेच काय तर संबंधित गुत्तेदाराने ग्रामपंचायतचे खोटे नाहरकत वापरून इ टेंडरिंग साठी कामाचे प्रस्ताव दाखल केले आहेत ,यात कोणी लोकप्रतिनिधी पाठीशी आहे की काय ही बाब चिंताजनक आहे अशी भावना वांगी वाशीय ग्रामस्थ यांनी व्यक्त केली आहे आणि जर असेल तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही आणि आमचे सगेसोयरे यांच्या मार्फत नक्कीच बंदोबस्त करू असा निर्धार देखील केला आहे वांगी येथील जनतेचे होणारे हाल हे वर्षानुवर्षे होत आहेत जनता पावसाच्या पाण्यात त्रस्त आहेत त्यामुळे लोकप्रतिनिधी व बांधकाम विभाग यांनी कोणाला पाठीशी घालू नये व मर्यादा बाळ गाव्यात असे देखील येथील ग्रामस्थ ठोस बोलून रोष दाखवला आहे.
त्यामुळे सदरील विषयावर प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची विनंती वांगी येथील ग्रामस्थ यांनी केली, वांगी येथील जनता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात उपोषणास बसणार आहे व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार देखील घालणार आहे असे सरपंच दत्ता जाधव यांनी प्रशासनास ३१ जुलै रोजी निवेदन दिले आहे.
यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष गोविंदराव जाधव उपाध्यक्ष नागोराव जाधव पोलीस पाटील राहुल जाधव ,संभाजी जाधव ,प्रसाद जाधव, दत्ता चांदू जाधव, पद्माकर तारू ,मनोहर पांचाळ ,आनंदा खोंडे, सुदाम जाधव, रतन जाधव, आनंदा चोपडे, यांच्या सहित अनेक गावकरी मंडळी उपस्थित होते.