गुरुद्वारात दिल्लीहुन आलेल्या सायकल समुहाचे उत्साहाने स्वागत संतबाबा कुलवंतसिंघजीने केली प्रशंसा
नांदेड। शीख धर्मातील पाच तखतांची (धर्मपीठ) सायकल यात्रा करून दर्शन घेण्याचे संकल्प करून नांदेडच्या तखत सचखंड हजुरसाहिब गुरुद्वारा येथे पोहचलेल्या यात्रेकरूंचा येथे उत्साहाने स्वागत सत्कार करण्यात आले. तर गुरुद्वारा सचखंडचे जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी आणि सहायक जत्थेदार संतबाबा रामसिंघजी यांनी पन्नाशी गाठलेल्या सायकल स्वारांचा विशेष असा सत्कार करून त्यांची प्रशंसा केली.
वरील विषयी माहिती अशी कि दिल्ली येथील टर्बोनेटर ग्रुप तर्फे “फैज ए नूर” यात्रे द्वारे शीख धर्मातील पाच तखतांची यात्रा करण्याचे संकल्प केले गेले होते. विशेष बाब म्हणजे या समुहातील अधिकत्तर सदस्य हे पन्नाशी गाठलेले आहेत. त्यांच्यावतीने या अगोदर चार तखतांची यात्रा यशस्वीरित्या पूर्ण केली गेली. नांदेडच्या गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी या चमुने दिनांक 21 ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या मोतीबाग गुरुद्वारा येथून पहाटे यात्रा सुरु केली होती. चौदाशे किलोमीटर अंतराची यात्रा नौ दिवसात पूर्ण करत टर्बोनेटर समुहाने दिनांक 29 ऑक्टोबर रोजी दुपारी नांदेड गाठले. नांदेड आगमन वेळी गुरुद्वारा मालटेकडी साहेब येथे सायकल समूहाचा जंगी स्वागत व सत्कार करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ता पत्रकार रविंद्र सिंघ मोदी, शिवसेना उप शहर प्रमुख सरदार लड्डूसिंघ काटगर, गुरुद्वारा बोर्ड माजी सदस्य स. मनप्रीतसिंघ कुंजीवाले, वारिस ए लाहौरी खालसा फौजचे सरदार जगजीवनसिंघ रिसालदार, सरदार हरबंससिंघ वासरीकर, सामाजिक कार्यकर्ता सरदार किरपालसिंघ हजुरिया, मालटेकडीचे पुजारी सरदार रविंद्रसिंघ पुजारी, सरदार पपिंदरसिंघ पुजारी, सरदार कश्मीरसिंघ भट्टी यांच्या सह मोठ्या संख्येत युवकांनी सायकल सवारांचा सिरेपाव व पुष्पहाराने सत्कार केला. शिवसेना उप जिल्हाप्रमुख सरदार दर्शनसिंघ सिद्धू, सरदार जसपालसिंघ सिद्धू यांनी आतिशबाजी करून सायकल समुहाचे स्वागत केले.
सायकल समूहाचे गुरुद्वारा गेट क्रमांक एक येथे सत्कार करण्यात आले. संतबाबा कुलवंतसिंघजी आणि संतबाबा रामसिंघजी यांनी तखत साहेब आणि डेवढ़ी येथे सिरेपाव देऊन सर्व सायकल सवारांचे सत्कार केले. तसेच पन्नाशी गाठून देखील लांब पल्ल्याची सायकल यात्रा केल्यामुळे यात्रेकरूंची प्रशंशा केली. या सायकल समुहाची हजुरसाहेब नांदेड येथे ठिकठिकाणी सत्कार करण्यात आले.