करियरनांदेड

Scholarship Scheme : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना

विद्यार्थ्यांना 20 जुलै पर्यंत अर्ज करण्याची मुदत

नांदेड| साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांनी येत्या 20 जुलै 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत संपूर्ण कागदपत्रासोबत जिल्हा कार्यालयात संपर्क करावा. उशिरा मुदतीनंतर आलेले कागदपत्रे अर्जाचा जिल्हा कार्यालयामार्फत स्विकार करण्यात येणार नाही, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी गुण प्राप्त झाले असतील अशा उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना महामंडळाकडून ज्येष्ठता व जास्त गुण क्रमांकानुसार उपलब्ध निधीच्या अधीन राहून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.

पुढीलप्रमाणे मुळ कागदपत्रे दोन प्रतीत आणावीत. मार्कशिट, शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड, जातीचा दाखला, उत्पनाचा दाखला, आधारकार्ड, दोन फोटो, पुढच्या वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकीटसह व जिल्हा व्यवस्थाकाच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज इत्यादी कागद पत्रासह संपर्क साधावा.

जिल्हा कार्यालयाचा पत्ता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ग्यानमाता शाळेच्या समोर नांदेड दूरध्वनी 02462-220088 मो.नंबर 9309151060 हा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!