
हदगाव| समस्त बंजारा समाजाचे श्रद्धा स्थान , क्रांतीकारी सद्गुरू सेवालाल महाराज यांची 285 वी जयंती मोठ्या उत्साहात हदगाव येथे भव्य मिरवणूक काढून साजरी करण्यात आली. या मिरवणुकीत गोर बंजारा समाजातील महिला मोठ्या प्रमानात पारंपारीक वेशभूषा पारिधान करून उपस्थीत होत्या. सद्गुरू सेवालाल महाराज जयंतीची मिरवणूक रामलीला मैदान येथून मोठ्या उत्साहात सुरूवात करून राष्ट्रीय क्लब येथ हदगाव तालुक्यातील सर्व नायक , कारभारी ,गोर बंजारा समाजातील कार्यक्षम पदाधिकारी व शासकीय कर्मचारी वर्गाचा सत्कार करून सांगता करण्यात आली.
