नांदेडसोशल वर्क

प्रभु रामचंद्र यांच्या बदल अपशब्द वापरणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्या वर गुन्हा दाखल करा, भाजपा पदाधिकारी यांच्यी मागणी

नवीन नांदेड। प्रभु रामचंद्र यांच्या बदल अपशब्द वापरणारे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपा नांदेड शहर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते व पदाधिकारी यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन नांदेड येथे सहाय्यक प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांच्या कडे प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी प्रभु रामचंद्र बदल दिनांक 03/01/2024 रोजी राष्ट्रवादी कॉग्रेसचे जितेंद्र आढाव यांनी भारत देशाची आस्था असणारे प्रभु रामचंद्र यांच्याबद्दल अपशब्दाचा बापर करुन पूर्ण भारत देशातील तमाम हिंदू बांधवाचे मन दुख:विण्याचे काम केलेले आहेत. तसेच जातीय तेढ निर्माण करण्याचे काम हे वारंवार करीत आहेत.

भारतीय जनता पार्टी नांदेड महानगर च्या वतीने विनंती करण्यात येते की राष्ट्रवादी कॉग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी दिलीप व्यंकटराव कंदकुर्ते (महानगराध्यक्ष) भाजपा नांदेड, शितल खाडिल, नवनाथ पांडूरंग कांबळे (अनु. जाती महानगर जिल्हाध्यक्ष), भाजपा शहर उपाध्यक्ष वैजनाथ देशमुख,ऋषिकेश मैड पंचायत राज ग्रामविकास महानगर संयोजक ,भाजपा सिडको मंडळ अध्यक्ष सचिन रावका ,निखलेश देशमुख ,ओमप्रकाश शिरेवार,अनिल लोखंडे,अमोल कुलथिया, यांच्या सह पदाधिकारी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!