नायगाव, रामप्रसाद चन्नावार। भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला संविधान अर्पण केले होते. २६ नोव्हेंबर हा दिवस होय भारतीय देशासाठी अतिशय कर्तव्य मोठा दिवस असून या दिवशी देश स्वतंत्र झाल्यानंतर या दिवशी च संविधान भारताला बहाल करण्यात आले होते. याच दिवसाचे औचित्य साधून २५ नोव्हेंबर २०२३ रोजी मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय अँड.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान बचाव सन्मान रॅली व सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
हे संविधान वाचवण्यासाठी भारतातील प्रत्येक नागरिकांनी आपले प्रथम कर्तव्य समजुन त्या साठी चे प्रयत्न करणे गरजेचे आहे . भारतामध्ये आज या संविधानामुळे देशात शांतता, समानता, न्यायव्यवस्था टिकून आहे तसेच कायदा सुव्यवस्था अन्याय अत्याचार महिलांचे रक्षण हे सर्व काही अधिकार संविधानामुळेच आपल्याला मिळालेला आहे. तेच संविधान बदलण्याच्या मार्गांवर सरकार असल्या कारणाने हि संविधान सन्मान रॅली व सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
म्हणुन संविधान वाचवणे हे आपल कर्तव्य समजून याच कारणास्तव मुंबई येथे होत असलेल्या सभेस प्रत्येक भारतीय नागरिकांनी उपस्थिती राहुन आपले कर्तव्य पार पडावे. यामध्ये सर्व संविधान प्रेमी व नागरिकांनी तसेच नांदेड दक्षिण जिल्हा व नायगांव बिलोली देगलुर धर्माबाद तालुक्यातील समस्त आजी-माजी तालुका शहर शाखा सर्कल वार्ड पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शेकडोच्या संख्येने या सभेस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे,असे विनंती पूर्वक आवाहन वंचित बहुजन युवा आघाडी नांदेड दक्षिण चे जिल्हा उपाध्यक्ष,दिपक माधवराव गजभारे घुंगराळेकर यांनी केले आहे.