सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती सिडकोच्या वतीने आज भव्य मिरवणूकीचे आयोजन
नवीन नांदेडl रयतेचे राजे कुळवाडी भूषण ,बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने दिनांक १९फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा हडको येथुन मुख्य रस्त्याने मिरवणूकीचे आयोजन व सायंकाळी जिजाऊ सृष्टी चेतन शिवाकुंर आयोजित शाहीरी जलसा आयोजन करण्यात आले आहे.
सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती, मराठा सेवा संघ,जिजाऊ ब्रिगेड व शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने हडको येथुन भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आले असून उदघाटक आ. मोहनराव हंबरडे, पोलीस उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक, प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने ,माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे,माजी नगरसेविका मंगला देशमुख, इंदुबाई घोगरे,बेबीताई गुपीले, माजी नगरसेवक श्रीनिवास जाधव यांच्या उपस्थितीत होणार आहे.
तर सायंकाळी ७ वाजता चेतन सेवाकुंर आयोजित शाहीरी जलसा या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, उदघाटक आमदार मोहनराव हंबरडे,विशेष आमंत्रित खा. हेमंत पाटील,माजी आमदार अमर राजूरकर, आ. राम पाटील रातोळीकर यांच्या सह मान्यवरांच्यी उपस्थिती राहणार आहे,या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन शिवजन्मोत्सव समिती सिडको अध्यक्ष दिगंबर शिंदे व सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती पदाधिकारी सिडको यांच्या वतीने करण्यात आले आहे.